डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून कुमारी अनुष्का मेश्राम प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०५/०५/२५ शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ च्या इयत्ता बारावी नागपूर बोर्डाचा आज निकाल घोषित झाला.चंद्रपूर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील विज्ञान शाखेतील कुमारी अनुष्का विनोद मेश्राम हिने ८८.६७% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर
कुमारी जानवी नितीन चव्हाण - ८२.८३%
कुमारी आर्या सुनील भडके- ८१.१७ % गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्राविण्य प्राप्त केले.
त्यांनी मिळविलेल्या या घवघवीत गुणवत्तेबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य देवेश कांबळे, प्राध्यापक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.मिळालेल्या गुणवत्तेचे श्रेय तिन्ही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण यांना दिलेआहे.