टिप्परने मोटार सायकल चिरडले.आजी आजोबा च्या डोळ्या देखत दोन नातवंडाचा मृत्यू ; आजी आजोबा गंभीररित्या जखमी.
एस.के.24 तास
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातून आज सकाळी अतिशय दुर्देवी आणि धक्कादायक बातमी आली आहे.यामुळे शेगाव,जळगाव जामोद परिसरच नव्हे तर जिल्हाच हादरला आहे.परिसरात झालेल्या भीषण अपघातात आजी आजोबाच्या डोळ्या देखत दोन नातवंडाचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत आजी आजोबा गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस व रुग्णालय सूत्रानी सांगितले. मृत बालक अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी संगितले.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणाऱ्या पीक पाणी आणि अन्य भाकीतसाठी प्रसिद्ध भेंडवळ नजिकच्या माऊली फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली.आज शुक्रवारी,9 मे रोजी सकाळी 11:30.च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या भीषण अपघात मध्ये टिप्परने मोटारसायकला चिरडले.