सावली पोलिसांनी पाठलाग करून पकडला गोवंश तस्करीचा ट्रक ; २२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त.
एस.के.24 तास
सावली : गोवंश तस्करी विरोधात सावली पोलिसांनी धाडसी कारवाई करत फिल्मी स्टाईल पाठलाग करून तस्करी करणारा ट्रक पकडला.या कारवाईत ३९ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे २२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,१५ मार्च रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास सावली पोलीस पथक नियमित रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी व्याहाड कडून सावली कडे येणारा टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्र.टीएस ०९ यूबी ८३८७ संशयास्पद अवस्थेत दिसून आला.

