मुल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.
एस.के.24 तास
मुल : शनिवारी सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आज रविवार 11 मे रोजी सकाळी मुल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला बुधा शेंडे वय,68 वर्ष हिचेवर वाघाने हल्ला केला असता तिचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम सुरू आहे.तेंदू पाने गोळा करण्यासाठी गावातील महिला,पुरुष, मूल,मुली सकाळीच जंगलात जातात.उन्हाच्या तीव्रतेने पाण्याच्या शोधात वाघ जंगलात फिरत असतो.त्याच वेळी तेंदुपत्ता तोडण्याचे काम सुरू असते.