चिमूर तालुक्यातील नेरी मार्गावर भुमि एम्पायर ले - आऊट मध्ये युवकाने प्रेयसी समोरच पांढऱ्या शेल्याने गळफास घेऊन केली आत्महत्या.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर तालुक्यातील नेरी मार्गावर असलेल्या भुमि एम्पायर ले-आऊट आहे. तेथील कडूूलिंबाच्या झाडावर मंगळवारी (20 मे ) सांयकाळी सातच्या दरम्यान उमरेड तालुक्यातील युवकाने त्याच्या प्रेयसी समोरच पांढऱ्या शेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दोघांचेही कुटूंब लग्न लावून देणार होते.युवकाच्या मृत्युने लग्नांचे स्वप्न भंग झाले.मृताचे नाव प्रितम यशवंत वाकडे वय,25 वर्ष रा. पिंडकेपार ता.उमरेड) असे आहे.
चिमूर तालुक्यातील एका खेड्यात मामाचे गाव असल्याने प्रितम याचे चुलत मामे बहिणीशी सूत जुळले.लग्नाच्या आणाभाका झाल्या.याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना झाली.
दोन्ही कुटुंब त्यांचे लग्न लावून देण्यास तयार सुद्धा होते.मुलीच्या गावातून मिळालेल्या माहितीप्रमाणे तिच्या कुटुंबाने पुढील वर्षी लग्न लावून देतो असे सांगितले. प्रितम यांस यावर्षीच लग्न करायचे होते.
घटनेच्या दिवशी प्रेयसीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात एम.ए.चा पेपर होता.त्याकरीता ती पेपर द्यायला आली होती.याची माहिती प्रितमला झाल्याने तो सुद्धा तिला भेटायला चिमूरला आला.
पेपर संपताच दोघेही चिमूर - नेरी मार्गावरील भुमि एम्पायरच्या ले आऊट मध्ये आले.त्यांच्यात लग्नाच्या संबंधात व इतर चर्चा करताना वाद झाला.आता मी गळफास घेतो असे म्हणून नजीकच असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला पांढरा शेला बांधला व प्रेयसीच्या डोळ्यादेखत त्याने गळफास घेतला.
प्रेयसीने धावून जात पाय पकडून वाचविण्याचा प्रयत्न केला.काही कळण्यापुर्वीच प्रितमने झटका दिल्याने त्याचा मृत्यू झाला व प्रेयसी त्याला घेऊन खाली पडली.
तिने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.कुटुंबीयांकडून चिमूर पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष बाकल, स.पो.नि.निशांत फुलेकर, सहाय्यक उप पो. नि. विलास निमगडे घटनास्थळी पोहोचले.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.21 मे, बुधवारी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी दिली.