" पुस्तकाचे घर " (ग्रंथसहवास) तर्फे गुणवंत हर्षल विखारचा गौरव.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२१/०५/२५ ब्रम्हपुरीतील प्रसिद्ध कवी,लेखक व पत्रकार डॉ. धनराज खानोरकर यांचे कुर्झा वार्डातील " पुस्तकाचे घरा " (ग्रंथसहवास) तर्फे विशेष गौरव कार्यक्रम पार पडला.नुकताच घोषित झालेल्या दहावी शालांत परीक्षा निकालात नेवजाबाई हितकारिणी हायस्कुलचा कुर्झा वार्डातील हर्षल मोरेश्वर विखार याला ९० टक्के गुण प्राप्त झाले.
त्याचा मान्यवराच्या हस्ते यथोचित विशेष गौरव करण्यात आला.हर्षलने कोणतीही शिकवणी न लावता मेहनतीने हे यश संपादन केले. " पुस्तकाचे घरा " चे संचालन डॉ.धनराज खानोरकर, नगरपालिका माजी बांधकाम सभापती विलास विखार,डॉ.बबन राऊत,सुखदेव खेत्रे,सागर घोरमोडे यावेळी उपस्थित होते.कु.हर्षल व त्याचे वडील मोरेश्वर विखार यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,ग्रंथ व रोख रक्कम भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी उपस्थितांनी हर्षलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.