रानटी डुकरांचा चिरोली गावात धुमाकूळ तीन महिला व म्हशीचा बचडा जखमी.
📍वनविभागाने त्वरित डुकरांचा बंदोबस्त करावा.अन्यथा आंदोलन करण्याचा गावकऱ्याचा इशारा.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मुल तालुक्यातील चिरोली येथे सकाळी 8:00. वा.रानटी डुकराने चक्क गावामध्ये येऊन हैदोस माजविल्याने तीन महिला जखमी झाल्या.
कु.शिवण्या प्रेमदास केस्तावार वय,9 वर्ष, सौ.सीताबाई देवाजी येरमलवार वय,60 वर्ष सौ.बेबीबाई कुंभारे वय,65 वर्ष हे गंभीर जखमी झाले.
या बाबतची माहिती काँग्रेस नेते संतोषशिंह रावत यांना मिळताच त्यांनी त्वरित काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेंद्र वाढई, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले,प्राणीमित्र उमेश झिरे,क्षेत्र सहाय्यक खणके,वनरक्षक माधवराव धुळगडे दहेगाव,वनरक्षक एस.जी.गेडाम वनरक्षक येसांबरे,वनरक्षक ठाकूर यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय मुल भरती केले.
पुढील उपचारासाठी एका लहान मुलीला रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी तीन ही महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी रुग्णांना भेटी देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले.