उपोषणाची यशस्वी सांगता सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश ; अखेर लाभार्थीना रॉयल्टीचे वाटप,सावली तालुक्यातील जनतेला मिळनार हक्काची रेती.
📍महाराष्ट्रात रेतीसाठी आमरण उपोषण करण्याची पहिली वेळ,काँग्रेसच्या आंदोलनाने जनतेत आनंद.सावली तालुका काँग्रेसचा सामान्य नागरीकांना दिलासा.
एस.के.24 तास
सावली : पावसाळ्याचे दिवस जवळ येत असतांना सुधा सामान्य नागरीकांना रेतीची उपलब्धता करुण देण्यात प्रशासन अडचणी आणीत होते.वास्तवीकता शासनाने फरवरी मार्च महिन्यात नविन वाळू धोरण आणले होते. मात्र याची अंमलबजावणी करण्यात आली नाही.आजपर्यंत शासनाने वाटू धोरण आणले,मात्र सामान्य माणसाच्या हिताचे वाळू धोरण राबविण्यात काही ना काही तृट्या निर्माण करुन ठेवल्या.परिणामता सामान्य माणसांना वाळू मिळेनाशी झाली.
दिवसागणिक शासनाच्या वाळू धोरणात बदल होत गेले. त्यामुळे सामान्य नागरीकांच्या मनात द्वेवाची भावना निर्माण होत गेली.हाच धागा पकडून सावली तालुका काँग्रेस पक्षाने प्रशासनास अनेकदा निवेदने दिले. जिल्हाधिकारी, पालकमंत्री ,खणीकर्म अधिकारी,तहसीलदार यांना निवेदने देऊन सामान्य नागरीकांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती. मात्र प्रशासनाने सावली तालुका काँग्रेस पक्षाचा मागणीकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्याची भूमीका वळविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने 30/04/2025 रोजी एक परीपत्रक काढून सामान्य घरकुल धारकांना रेती उपल्बध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना प्रशासनास दिल्या होत्या.मात्र प्रशासनाने या परीपत्रकाचा सोयीचा अर्थ लावून नागरीकांना रेतीची उपलब्धता करून देण्यास विलंब लावण्याचा प्रयत्न केला होता.सावली तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या संबंधात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेवून सार 30 एप्रील 2025 च्या परिपत्रकाबाबत चर्चा घडवून आणून त्वरित रेती उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
मात्र सदर प्रक्रिया पूर्ण होते न होते,खणीकर्म अधिकाऱ्यांनी १३ रकाण्याची माहिती ग्रामपंचायत स्तरावरून मागविण्याची प्रक्रिया सुरु केली होती. हि प्रक्रिया वेळखाऊ आहे या प्रक्रियेत विलंब लागेल तोपर्यंत पावसाळा सुरु होईल परिणामता नागरिकांना रेतीची उपल्बधता होणार नाही.अशी भूमीका जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिनेश पाटील चिटणुरवार यांचा नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेतली.
मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे दिनांक 21/5/2025 रोजी आमरण उपोषण करण्याचा ईशारा देण्यात आला होता. त्यात घरकुल धारकांना मोफत वाळूचा पुरवठा करण्यात यावा ही मुख्य मागणी होती.उपोषणाचा ईशारा देताच सावली तालुका प्रशासन जागे झाले, जि तेरी कलमीची माहिती तहसील प्रशासनास आवश्यक होती ती माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र तहसीलदार यांनी सर्व संबंधिताना दिनांक 16 मे 2025 रोजी पाठविले.
आमरण उपोषणाचा इशारा देताच प्रशासन कामास लागले.आज घरकुल लाभार्थीना रॉयलटीचे वाटप करण्याबाबतचे पत्र तहसीलदार यांनी उपोषण कर्त्यांना दिले,व ज्या घाटातून रेतीची उपलब्धता करून देण्यात येईल यांची चर्चा सुद्धा केली. काँग्रेसच्या आंदोलनामुळे आता घरकुल लाभार्थिना रॉयलीटीचे वाटप होण्याचा मार्ग मोकडा झाला आहे.आज उपोषणादरम्यान काही नदी घाटात पाणी असल्यामुळे रेती उपसा होनार नाही.
ही बाब निर्दशनास आणून देण्यात आली.दरम्यान उपोषण मंडपात तहसीलदार यांनी भेट दिली.नायब तहसीलदार चांदेकर यांनी मागण्या समजून घेतल्या. सावली तालुक्यातील जनतेला आता रेतीची उपलब्धता होणार असल्यामुळे तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.उपोषणा दरम्यान सावली तालुक्यातील बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीस मर जायेंगे कट जायेंगे मगर इरादेसे नहीं हटेंगे अशी भूमीका सावली तालुका कॉग्रेसने घेतली होती. जनतेची मागणी लक्षात घेता तोडगा काढणे आवश्यक होते. सावली तालुका काँग्रेसने आमरण उपोषण करून महाराष्ट्रात अभिनव उपक्रम केला अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.सावली तालुका काँग्रेस कमिटीचे या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य पांडुरंग तांगडे,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पाटील चिटणुरवार,तालुका अध्यक्ष नितीन गोहने, माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा सचिव यशवंत बोरकुटे शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी नगराध्यक्षा लता लाकडे,माजी सभापती प.स.विजय कोरेवार
विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,बोथलीचे सरपंच सुशील नरेड्डीवार,उपसरपंच विजय गड्डमवार,कृषी उ.बा.स.संचालक सुनील बोमणवार,संचालक अरविंद भैसारे,संचालक केशव भरडकर,संचालिका कांताबाई बोरकुटे,ग्राम काँग्रेस कमिटी मोखाळाचे अध्यक्ष अनिल मशाखेत्री,लोंढोली ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष दिलिप लटारे
उसेगाव ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पाल,रुद्रापूर ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष खुशाल राऊत,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,नितेश रस्से,नगरसेविका साधना वाढई,हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके,हरांबाचे उपसरपंच प्रवीण संतोषवार,जेष्ठ पदाधिकारी उत्तम जुमनाके, किशोर घोटेकर,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.