कोटगल - विसापूर मार्गावर मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
गडचिरोली : अचानक दुचाकी समोर आलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली- विसापूर मार्गावर रविवारी दुपारी 3:00. वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात संगीत मंडल वय,58 वर्ष रा.कोटगल यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,संगीत मंडल हे भाजीपाला घेऊन आपल्या दुचाकीने कोटगल कडे जात होते.प्रवासादरम्यान अचानक एक मुलगा रस्त्यावर दुचाकीसमोर आला. मुलाला धडक होऊ नये म्हणून संगीत यांनी तत्काळ ब्रेक दाबले. जोरात ब्रेक लागल्याने दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना देखील याबाबत सूचना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोटगल गावात शोककळा पसरली आहे.

