राष्ट्रसंतांची प्रेरणा ही आमची जीवन ऊर्जा. - प्राचार्य डॉ. गहाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०२/०५/२५ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवतावादी संत होते.त्यांच्या दूरदृष्टीतून नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेची स्थापना झाली.कर्मयोगी मदनगोपालजींच्या भैयांच्या दातृत्वातून व महाराजांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना केली गेली व ही संस्था भरभराटीस आली.
अनेकांना रोजगार उपलब्ध झाला, त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही आमची जीवन ऊर्जा आहे " असे विचार प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी मांडले.ते महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रमात बोलत होते.
महाराजांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ डी एच गहाणे व उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ.धनराज खानोरकर,अधीक्षक संगीता ठाकरे,मेजर विनोद नरड
डॉ कुलजित शर्मा, डॉ किशोर नाकतोडे, डॉ.भास्कर लेनगुरे, डॉ पद्माकर वानखडे, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,प्रा जयेश हजारे, डॉ अरविंद मुंगोल, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,डॉ अतुल येरपुडे,प्रा खोब्रागडे,प्रा ठोंबरे, डॉ ज्योती दुपारे,रोशन डांगे,रुपेश चामलाटे, शशिकांत माडे,सुषमा राऊत इत्यादींनी महाराजांच्या फोटोला पुष्प वाहून अभिवादन केले.
या प्रसंगी आलोक मेश्रामांनी महाराजांचा भजन गाऊन अभिवादन केले.संचालन डॉ युवराज मेश्राम तर आभार डॉ धनराज खानोरकरांनी मानले. यशस्वीतेसाठी समितीच्या सदस्यांनी व जगदिश गुरनुले,प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.