सेवा हक़्क दिन हा नागरिकांची सनद. - डाँ.डी.एच. गहाणे प्राचार्य नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,ब्रम्हपुरी
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे औचित्याने ते अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना केलेले प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : गुड गव्हर्नर तेच उत्तम शासन असते जे नागरिकांना उत्तमातली उत्तम सेवा पुरविली जाते. विषयी नागरिकांना शासनाच्या योजना व सेवा जनतेपर्यत पुरविणे व जनतेत जागृती घडविणे या उदात्त हेतुतून शासन स्तरावर परिपत्रक काढून सेवा हक्क कायदा अमंलात आणला गेला.याचा अर्थ जनतेला योजना व सेवा पुरविणे हेच शासनाचे आद्य कर्तव्य आहे.
तेव्हाच उत्तम शासन आहे असे म्हटले जाते. या कसोटीवर उतरण्यासाठी शासनाने सेवा हक्क दिनाची सुरुवात करुन त्याला कायद्यात रुपातंर केले त्या कायद्याला २८ एप्रिल २०२५ ला दहा वर्ष पुर्ण होत असून दसवर्षोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. आज ह्या कायद्याने दहा वर्षात सरकारी सुविधा पुरविण्याचे उत्तम कार्य केले आहे.आणि म्हणून हा दिवस ख-या अर्थाने नागरिकांची सनद आहे.
असे मौलिक विचार डाँ.डी.एच गहाणे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य डाँ.शुभाष शेकोकर सर, मेजर विनोद नरड,प्रा.आनंद भोयर व डाँ.प्रकाश वट्टी हे विचारपीठावर उपस्थित होते.
डाँ.शुभाष शेकोकर यांनी सेवा हक्क कायदा नागरिकांनी समजून घेतला पाहिजे. असे मौलिक मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक डाँ प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार डाँ.विवेक नागभिडकर यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.