दिड वर्षापासून जि.प.शाळेच्या शौचालयाचे बांधकाम अपूर्ण.संबंधित अधिकारी व प्रशासक यांची डोळेझाक.

दिड वर्षापासून जि.प.शाळेच्या शौचालयाचे बांधकाम अपूर्ण.संबंधित अधिकारी व प्रशासक यांची डोळेझाक.


एस.के.24 तास


पोंभूर्णा : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जामखूर्द येथील जि.प शाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या 67 आहे. शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शौचालयाची सुविधा नाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


पूर्वीचे शौचालय जीर्ण झाल्यामुळे नविन शौचालय निर्मितीला पंधरावा वित्त आयोगा मधून मंजुरी देण्यात आली.व त्यानुसार बांधकामही चालू करण्यात आले.परंतु दीड वर्षे लोटूनही बांधकाम अपूर्ण असल्याने शालेय विद्यार्थ्यांना शौचास जाण्या करिता अडचण निर्माण होत आहे.एकीकडे शासन एक पाऊल स्वच्छतेकडे उचलताना दिसत आहे तर दुसरिकडे दोन पाऊले मागे जातांना दिसून येत आहे.


शौचालयाच्या अभावामुळे विदयार्थ्यांना उघड्यावर जावे लागते त्यामुळे अनेक जंतुसंसर्ग रोगांना सामोरे जावे लागत असल्याने शौचालय पूर्णत्वास केव्हा जाणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागलेले आहेत.


यापूर्वीही अनेकदा शाळा व्यस्थापन समिती,मुख्याध्यापक यांचेकडून भौतिक सुविधांबाबत अनेक पत्रे ग्रामपंचायतीला देण्यात आली.असून त्याचाही विचार केलेला नाही.   


येत्या आठ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी पालकवर्ग व विध्यार्थ्यासमवेत आंदोलनाचा इशारा केला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !