संशोधक विद्यार्थ्याने निरंतर परिश्रम घणे गरजेचे मराठी संशोधन केंद्राचा उपक्रम. - प्राचार्य डॉ.शेकोकर.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : " कोणत्याही विषयाचे संशोधन करतांना खूप काळजी घ्यावी लागते. भाषेतील एखाद्या विषयाचे संशोधन ही समाजासाठी पूरक असावे लागते.समाज तुमच्याकडे मोठया आशेने पाहत असतो.समाजाला काहीतरी नवं हव असते.
त्यामुळे संशोधन करतांना संशोधक विद्यार्थ्याने निरंतर परिश्रम घेवून आपले संशोधन कार्य वेळेच्या आत पूर्ण करावयाचे असते." असे बहूमूल्य विवेचन कार्य. प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्रातर्फे आयोजित आचार्य पदवी विद्यार्थ्यांच्या सहामाही प्रगती अहवाल कार्यक्रमात बोलत होते.
विचारपीठावर मराठी विभाग व संशोधन केंद्र प्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर, विशेष विषय तज्ज्ञ डॉ जगदिश मेश्राम,संशोधन विभाग प्रभारी डॉ.योगेश ठावरी,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे उपस्थित होते.यावेळी मराठी विभागातील १८ संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहामाही प्रगती अहवाल सचित्र सादर केला.परिक्षणानंतर विभागप्रमुख डॉ.खानोरकर, डॉ.ठावरीं व डॉ.मेश्रामनी आपली मते मांडली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ वानखडे तर आभार डॉ वट्टीनी मानले.कार्यक्रमाला संशोधक विद्यार्थ्यांसह पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थ्यीही उपस्थित होते.