एका अष्टपैलू नारीचे व्यक्तिमत्व समाजासाठी सतत झटणाऱ्या प्राध्यापिका,संशोधक आणि कार्यकर्त्या,डॉ.स्निग्धा कांबळे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१५ /०७/२५ समाजशास्त्रातील सखोल अभ्यास,शिक्षण क्षेत्रातील व्यापक योगदान,संशोधनातील कुशल दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण जीवनयात्रा लाभलेल्या डॉ.स्निग्धा राजेश कांबळे यांचा आज (15 जुलै) वाढदिवस.त्यांच्या कार्यमूल्यांनी समृद्ध अशा प्रवासाचा मागोवा घेतला असता,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व समोर येते.
डॉ.कांबळे यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए.एम.एड. एम.फिल.पीएच.डी.अशा अनेक पदव्या मिळवून स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले.सध्या त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी २००७ ते २०१६ पर्यंत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयात (B.Ed.) अध्यापन केले. २०१६ पासून आत्तापर्यंत पदवी व पदव्युत्तर स्तरावर अध्यापन कार्यात त्या सक्रीय आहेत. एम. फिल. स्तरावरील मार्गदर्शन आणि तीन विद्यार्थ्यांचे पीएच. डी. संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी गोंडवाना विद्यापीठ,मराठी समाजशास्त्र परिषदा,अखिल भारतीय समाजशास्त्र परिषद,आणि विकसन मराठी समाजशास्त्र परिषद यांसारख्या संस्थांमध्ये कार्यकारी सदस्य, कोशाध्यक्ष आणि आजीवन सदस्य म्हणून योगदान दिले आहे.
समाजकार्य आणि नेतृत्व : - दिव्यदीप फाउंडेशन ब्रह्मपुरी (MH/140/2022) च्या अध्यक्षा म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली आहे. २०२२ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात १५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण जनजागृती, संविधान विषयक प्रचार, गरीब विद्यार्थ्यांना सायकल व साहित्य वाटप अशा विविध उपक्रमात त्या सक्रीय आहेत. "पंचायत राज सशक्तिकरण" व "संविधान साक्षरता" यांसारख्या अभियानांमध्ये त्यांनी महिलांना नेतृत्व दिले आहे.
संशोधन आणि पुरस्कार : - " ब्रह्मपुरी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर पडलेला सामाजिक परिणाम" या विषयावर त्यांनी सखोल लघुसंशोधन सुरु केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय १३ शोध निबंध त्यांचे प्रकाशित झाले आहेत. मुस्लिम फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे "फातिमा शेख राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2022" ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थांमध्ये जबाबदारीचे कार्य : - त्या स्वयंदीप महिला सहकारी पतसंस्था ब्रह्मपुरी, बांधवकी महिला बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, नागपूर, दि महाराष्ट्र रूलर एज्युकेशन सोसायटी लाखांदूर या संस्थांमध्ये सचिव आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
एक प्रेरणादायी वाटचाल : - शैक्षणिक क्षेत्रातील नवे अध्याय, विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणारे उपक्रम, महिलांचे सशक्तीकरण, सामाजिक भान जपणारे आंदोलन आणि संविधान जागृती हीच त्यांच्या जीवनाची ओळख आहे. शिक्षिका म्हणून विद्यार्थीप्रिय,संशोधक म्हणून अभ्यासू आणि समाजसेविका म्हणून निःस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या डॉ.स्निग्धा कांबळे