ट्रॅक्टर अचानक उलटून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू ; पाच जण जखमी.
एस.के.24 तास
अमरावती : वीज वितरणासाठी वापरण्यात येणारे सिमेंटचे खांब घेऊन जात असलेला ट्रॅक्टर अचानक उलटून झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.जखमींना मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या पैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात आज १४ जुलै रोजी दुपारी मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरला फाट्यानजीक घडली. अनिकेत सुनील मुंदाफळे वय,२६ वर्ष रा.आष्टगाव असे मृताचे नाव आहे.
दीपक गणेश भोकरे यांना किरकोळ मार असल्याने त्यांचा उपचार उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू आहे.या झालेल्या भीषण अपघातात जखमींना तानाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पंडागरे,रवी परतेती, स्वप्निल फुके व आष्टगाव येथील ग्रामवासी यांची मदत मिळाली.
मोर्शीचे ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, सचिन भाकरे व पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. पंचनामा आटोपला असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.
अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधून इलेक्ट्रिकचे खांब वाहून नेण्यात येत होते. त्याचे वजन जास्त असते. या वजनामुळेच वाहनचालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला असावा,असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.