सख्ख्या बापाने 18 वर्षाच्या लेकीला संपवले अन् रचला आत्महत्येचा बनाव ; प्रेमाची मिळाली अशी शिक्षा.
📍वडिलासह सहभागी नातेवाईकांना अटक.
एस.के.24 तास
कर्नाटक : कुटुंबीयांचा मुलीच्या नात्याला विरोध हत्या करून कर्नाटक च्या कलबुर्गी तालुक्यातून ऑनर किलिंगचं हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे.येथे वडील आणि नातेवाईकांनी आपल्या 18 वर्षांच्या मुलीची हत्या केली.या मुलीचं दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम होतं. स्थानिकांनी सुरुवातीला सांगितलं की, मुलीने विष खालंल, मात्र पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आलं.
नुकतच कविताने कलबुर्गीच्या धर्मसिंह कॉलेज मधील पीयूसीमधून शिक्षण पूर्ण केलं होते. तिचं कुरुबा समाजातील एक रिक्षा चालक मलप्पा च्या प्रेमात होती. मात्र तिच्या कुटुंबाकडून याला विरोध होता. कुटुंबीयांनी वारंवार तिला मलप्पा पासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मात्र तरीही कविताला मल्लपा सोबत लग्न करायचं होतं, आणि कुटुंबीयांनी परवानगी न दिल्यास तिने पळून जाण्याची धमकी दिली होती.
27 ऑगस्टच्या रात्री या मुद्द्यावरुन पुन्हा एका कविता आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाला.तिचे वडील शंकर कोल्लूर, त्यांचा भाचा शरणु आणि नातेवाईक दत्तप्पा चोलाबारद यांनी घराच्या आत गळा आवळून तिची हत्या केली.आत्महत्येचा बनाव रचून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी त्यांनी कविताच्या तोंडात कीटनाशक औषध टाकलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी पुरावा मिटविण्यासाठी कविताचा मृतदेह चिक्का रोड जवळील शंकराच्या भावाच्या शेतात जाऊन जाळला.गावकऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की,मुलीने विषारी औषधं खाल्लं,त्यातून तिचा मृत्यू झाला.पोलिसांना संशय आल्याने त्यांची याचा तपास सुरू केला. त्यांना घटनास्थळावरुन अंशिक स्वरुपात जळालेले अवशेष सापडले आणि कटकारस्थान उघडं पडलं. यानंतर पोलिसांनी फरहताबाद स्टेशनमध्ये या बाबत गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणात वडील शंकर कोल्लूर यांना अटक करण्यात आली आहे.तर शरणू आणि दत्तपाचा तपास सुरू आहे. कविता 5 मुलीं मध्ये 4 क्रमांकावर होती.2 मोठ्या बहिणींचं लग्न झालं आहे. सर्वात लहान बहीण नववी च्या वर्गात आहे.