आरमोरी येथे लालानी मोटर्स शोरूम इमारत कोसळून 3 ठार व 3 गंभीर जखमी.
एस.के.24 तास
आरमोरी : येथे जूनी हिरो होंडा शोरुम (बँक ऑफ इंडिया जुनी इमारत )कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.इमारती मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
आणि निष्पाप लोकांचा बळी गेला.याला सर्वस्वी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांचे विरोधात हत्येचे गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते,भाई शामसुंदर उराडे,जयश्रीताई जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड,धर्मानंद मेश्राम,विनोद मडावी यांनी केली आहे.
1) तहसीन शेख,वय,30 वर्ष, रा.वडसा
२) अफसान शेख,वय,32 वर्ष,रा.वडसा
३) आकाश बुरांडे, रा.निलज
हे जागीच ठार झाले.
1) सौरभ चौधरी रा.मेंडकी ( जिल्हा चंद्रपूर)
2) विलास मने,वय,50 वर्ष,आरमोरी
3) दिपक मेश्राम,वय,23 वर्ष, रा.आरमोरी
हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरुम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरुम सुरु होती.
आज तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते,तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी वा नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून, त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.