सावली - मुल महामार्गावरील ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.
सावली : चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहरापासून जवळच असलेल्या अमन बिडी गोदाम जवळ झालेल्या ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक, 8/08/2025 रोज शुक्रवारी दुपारी,1:00 ते 2 च्या सुमारास घडली.
निलेश सुधाकर बोपनवार असे मृतकाचे नाव असून तो साखरी येथील रहिवासी आहे.
मुल वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या बजरंगी ट्रॅव्हल्स क्रमांक MH.12.KQ.2479 ने सावली वरून मुल कडे जाणाऱ्या दुचाकीस्वार निलेश बोपनवार (दुचाकी नंबर MH.CF.1164) ला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार निलेश बोपनवार हे जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन सावली चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून उत्तरणीय तपासणीसाठी शव ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविण्यात आले पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.