जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली येथील जान्हवी प्रविण चन्नावार हिने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वाढदिवसावर खर्च न करता आपल्या वाढदिवशी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अल्पपोहार देऊन साजरा केला.
तिचे वडील सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसाचा निमित्त अवाढव्य खर्चाला फाटा देऊन आपल्या व कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवशी गरजू लोकांना आपण समाजाचे काही तरी देणे आहोत ही भावना ठेवून कधी वृद्धाश्रमात तर अपंग,निराधार गरजू व्यक्तींना मदत करीत असतात.
जान्हवी हि पालिटेकनिक व बी टेक नुकतीच झाली असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या नंतरही नेहमी अविरतपणे गरजूंना मदत करण्याचा तिचा ध्यास आहे.तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच मोहनजी मटामी,जोगेंद्र कुजुर,माधुरी मतामी,प्रविण चन्नावार, व पालकवर्ग उपस्थित होते.