महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव (भोसले) येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/०८/२५ तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले )येथे शैक्षणिक सत्र २०२५ -२६ करिता विद्यार्थी नेतृत्वाला चालना देण्याकरिता शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली व त्यांना पदाच्या गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
प्रथम प्रत्येक वर्ग प्रतिनिधीची निवडणूक घेण्यात आली व निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधी मधुन मंत्रिमंडळाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश एम बगमारे यांनी सर्व मंत्रिमंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
मुख्यमंत्री- कु. हिमानी श्रीकृष्ण मिसार उपमुख्यमंत्री - श्रवण प्रकाश ठेंगरे तथा क्रीडामंत्री ,सांस्कृतिक मंत्री ,पर्यावरण मंत्री,शालेय शिस्त मंत्री व इतर सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
आर.टी.पुरी व श्री व्हि.एस.महाले शिक्षक यांनी मंत्रिमंडळाचे कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून दिली.सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता निवडणूक अधिकारी श्री.डी.एल.घ्यार सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.एस.एस.मेश्राम श्री.पी.आर.सेडमाके या शिक्षकांनी सर्व निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व इतर शिक्षकांनी पार पाडली.
श्री सचिन क-हाडे,श्री नाकाडे,श्रीराजेश क-हाडे, श्री.गावडकर शिक्षक व कु.अंशुल राऊत शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.