जारावंडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन.
एस.के.24 तास
एटापल्ली : जारावंडी,त.एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे क्रांतीचा विचार,शोषितांचा सखा, जनतेच्या व्यथा आपल्या लेखणीतून बोलकं करणारा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या लेखणीतून साकार झालेलं जगणं म्हणजेच समाजक्रांतीचं प्रभावी शस्त्र. त्यांनी केवळ साहित्य निर्माण केलं नाही,तर ते शोषितांच्या न्यायासाठी लढणारे झुंजार योद्धा होते.
आज त्यांच्या जयंतीदिनी मौजा जारावंडी येथे अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमा अंतर्गत जारावंडी येथील उप सरपंच मान.सुधाकरजी टेकाम यांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन तसेच मल्याअपरण करण्यात आले.सदर कार्यक्रमात मल्लाजी येनगंटीवार,रमेश बोनगीरवार,संदीप येनगंटीवार,भारत चन्नेवार,आकाश चन्नेवार,विकास चन्नेवार,कार्तिक चन्नेवार,आदी समजावांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.