जन सुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन मुल शहरात विरोधी कुती समितीची सभा आज.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : जन सुरक्षा विधेयक २०२४ या काळ्या कायद्याच्या विरोधात हा संविधान विरोधी कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने राज्यभरामध्ये एक मोठे आंदोलन निर्माण करण्यात येत आहे. याची धग मूल तालुक्यात पोहोचली आहे. या कायद्यान्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार असून संघटन बनवण्याचा,आपल्या अधिकारासाठी,
आपल्या शिक्षणासाठी,आपल्या रोजगारासाठी,आपल्या शेतीविषयक हक्कांसाठी महिलांच्या अधिकार रक्षणासाठी,धरणे देणे,आंदोलन करणे,मोर्चा काढणे तर दूरच एकूणच आमच्या स्वातंत्र्याला पूर्णपणे नकारणारे हे विधेयक रद्द करण्यासाठी सर्व पुरोगामी संघटना एकवटण्याचा असून या विरोधात आंदोलन उभे करण्याच्या दृष्टीने मुल मधील सर्व पुरोगामी संघटनांनी एक सभा व मार्गदर्शन शिबीर घेण्याचे ठरलेले आहे.
सर्व संविधान प्रेमी व जागरूक नागरिकाची सभा स्थानिक नवभारत विद्यालयात दि.१० ऑगष्ट ला दुपारी.१२ वाजता आयोजित करण्यात आली आहेसभेसाठी न चुकता संविधान पेशी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित ह राहावे असे आवाहन जन सुरक्षा विरोधक कुती समितीचे वतीने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी केले आहे.
या सभेत आंदोलनाची दिशा ठरणार असून मान्यवरांचे मागॅदशॅन लाभणार असल्याचे कळते.