तन,मन सुदृढ करण्याचे माध्यम म्हणजे खेळ. - प्राचार्य डॉ.वरभे ने.हि.महाविद्यालयात क्रीडा दिन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी -३०/०८/२५" ब्रह्मपुरी जशी शैक्षणिक नगरी तशीच ती क्रीडानगरीसुध्दा आहे.येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे सक्रीय संस्थासचिव अशोक भैयांनी भव्य क्रीडांगण,इन डोअर स्टेडियमची व खेळांसाठी लागणा-या निःशुल्क साहित्याची सोय आपल्याला करुन दिली आहे.
येथील मैदानावर चालणा-या विविध खेळातून खेळाडू घडले.ते राज्य,राष्ट्र पातळीवर पोहचल्याचा इतिहास आहे.राज्यस्तरीय हाॅकीस्पर्धा,हाॅलीबाॅल स्पर्धा नेहमी इथे घेतल्या जातात.
मेजर ध्यानचंदकडून आपण प्रेरणा घेऊन खेळांमध्ये कौशल्य प्राप्त केले पाहिजे. कारण खेळ तन,मन सुदृढ करण्याचे माध्यम आहे." असे विचार शांताबाई भैया महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव वरभेंनी व्यक्त केले.ते महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी ने. हि. महाविद्यालयाचे कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर तर प्रमुख अतिथीमध्ये क्रीडा विभाग प्रभारी डॉ.असलम शेख, डॉ रेखा मेश्राम.प्रा विनोद नरड, डॉ.धनराज खानोरकर,डॉ हर्षा कानफाडे,डॉ.कुलजित शर्मा, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर इ.मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी विविध खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुप्ष देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ.शेकोकरांनी मेजर ध्यानचंदच्या जीवनावर प्रकाश टाकला.
संचालन डॉ.कुलजित शर्मा तर आभार संजू मेश्रामांनी केले.कार्यक्रम ने.हि. महाविद्यालय व शांताबाई भैया महिला महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आला.