पोलीस भरती करणाऱ्या रुचिकाचा बॉयफ्रेंडने केला ओयो हॉटेल मध्ये खून.
एस.के.24 तास
नागपूर : नागपूर जिल्ह्यात २४ तासांत तीन खुनाच्या घटना घडल्याने नागपूर जिल्हा हादरला.यातील दोन हत्या शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडली. प्रेयसीच्या चारित्र्यावरील संशय बळावल्याने तिला ओयो हॉटेलमध्ये नेऊन निर्घृणपणे ठार मारल्याची धक्कादायक घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
यातील पहिली घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येतरी परिसरात समोर आली.रुचिका राजेश भांगे वय,२१ वर्ष रा.वेलकम सोसायटी,बोरगाव) असे मृत तरुणीचे नाव असून सौरभ शिवदास जामगडे (वय,२६ वर्ष रा.कळमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.आरोपी घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. रुचिका ही धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होती.
ती पोलिस भरतीची तयारी करीत असल्याने पोलिस लाईन टाकळी येथे सरावासाठी जात होती.सरावादरम्यान ती इतर तरुण मुलांसोबत व्यायाम करीत असे.यावरून सौरभच्या मनात संशय निर्माण झाला होता.त्याने हटकल्यानंतरही ती ऐकत नव्हती.अखेर सौरभ रुचिकाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने येतरी येथील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला.
येथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला.या वादातून सौरभने तीक्ष्ण शस्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली व तेथून फरार झाला.कळमेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी सौरभचा शोध सुरू केला आहे.

