समाजबांधवांना आधुनिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या.आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांना निवेदन सादर.

समता संघर्ष समाजपरिवर्तन संघटनेच्या वतीने निवेदन देतांना पदाधिकारी...

समाजबांधवांना आधुनिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या.आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांना निवेदन सादर.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक ३०/०८/२०२५ शनिवार ला समता संघर्ष समाजपरिवर्तन संघटनेच्या वतीने अनुसूचित जातीतील युवकांसाठी अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या " पारंपरिक गटई " ठेल्यांच्या योजनेत बदल करण्याची मागणी केली आहे.

बदलत्या काळानुसार स्वावलंबनासाठी युवकांना ऑटो-रिक्षा,पिकअप,मेटाडोर, कार यांसारखी आधुनिक व्यवसाय साधने शासनाने १००% अनुदानातून उपलब्ध करून द्यावीत, असे निवेदन विधीमान आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांना ३० ऑगस्ट रोजी देण्यात आले.


पारंपरिक गटई ठेले कालबाह्य...

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या निवेदनात, आजच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक गटई ठेले व तत्सम योजना समाजाच्या आर्थिक प्रगतीस अपुरी असल्याचे नमूद केले आहे. युवकांना रोजगारक्षम आणि स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी अधिक परिणामकारक साधनांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदन देताना सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले,प्रदेश महिला अध्यक्षा मायाताई मोहुर्ले,प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे,सचिव किशोर नरुले,सहसचिव संदीप येनगंटीवार, जिल्हा अध्यक्ष सुनील मोहुर्ले, जिल्हा सचिव योगेश गोरडवार,परमेश्र्वर मोहूर्ले,संजय गोरडवार, प्रमोद रामटेके,संतोष कोपुलवार,आदी पदाधिकारी उपस्थित होते.


अतिरिक्त मागण्या : - 


1) युवकांसाठी कौशल्यविकास कार्यशाळा आयोजित कराव्यात.

2) उद्योजकतेला चालना देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत.


3) बार्टी चे योजनेत विशेष सावलत देण्याची तरतूद करण्यात यावी.


4) प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे अनेक युवक नवे उद्योग उभारण्यात मागे पडतात ; शासनाने यावर ठोस उपाययोजना करावी.

“ समता संघर्ष समाजपरिवर्तन संघटनेने मांडलेली मागणी योग्य आहे.आज मादगी समाज अतिशय मागास आणि दुर्बल घटक म्हणून ओळखला जातो,आणि पारंपरिक व्यवसाय हे कालबाह्य स्वरूपात आहे, तरी पारंपरिक गटई ठेल्यांपेक्षा आधुनिक व्यवसाय साधनांची आजच्या काळात या समाजाला नितांत गरज आहे.हे निवेदन मी शासनापर्यंत पोहोचवून लवकरच याबाबत पुढाकार घेईन,” - आमदार डॉ.मिलिंद नरोटे 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !