6 जिल्हा परिषद वर राहणार महिलाराज ; अकोला, वाशीम,अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली व गोंदिया चा समावेश.

6 जिल्हा परिषद वर राहणार महिलाराज ; अकोला, वाशीम,अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली व गोंदिया चा समावेश.


एस.के.24 तास


नागपूर : विदर्भातील नऊ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. यासाठी अध्यक्षपदांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. हे आरक्षण अडीच वर्षांसाठी राहणार आहे.


नऊपैकी अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्हा परिषदांवर यंदा महिलांची सत्ता राहणार आहे.भंडारा व गोंदिया या जिल्हा परिषदांची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे. तेव्हा होणाऱ्या या दोन जि.प.साठीही आरक्षण काढण्यात आले असून, त्यातील गोंदिया जि.प.च्या अध्यक्षपदावरही महिलाच विराजमान होणार आहे.


राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. राज्यातील आठ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे खुल्या गटासाठी असणार आहे. याशिवाय राज्यातील १७ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.


अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती (एसटी) महिला या प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे अनुसूचित जमातींच्या मतदारसंघावर आता प्रत्येकच पक्षाचे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मावळत्या कार्यकाळात ओबीसी (महिला) वर्गासाठी राखीव होते. 


अनेक वर्षांनंतर बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. १९९२-९७ या काळात सूर्यकांत बाहेकर हे खुल्या प्रवर्गातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच प्रवर्गासाठी आरक्षण निघाले आहे. 


वाशीमचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवार्गासाठी राखीव झाले आहे. वाशीम जिल्हा परिषदेत या आधी एकदा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेला ही संधी मिळाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !