अ-हेरनवरगांव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : विकसित महाराष्ट्र २०४७ पर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट प्राप्ती करिता आणि ते पूर्ण करण्याकरीता गाव पातळीवरील पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचे योगदान मोठे करून त्रिस्तरीय संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा विकास करणे.
आणि ग्रामपंचायत व पंचायत राज संस्था अधिक सक्षम करून अस्तित्वात असलेल्या शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, अ-हेरनवरगांव येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेच्याअध्यक्षा सरपंचा सौ. दामिनी चौधरी, मार्गदर्शक सचिव रतीराम चौधरी,प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा वर्कर, प्रतिष्ठित नागरिक व गावातील महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सुशासन युक्त पंचायत,सक्षम पंचायत,जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण ,उपजीविका विकास,गृहनिर्माण सामाजिक न्याय
लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून लोक चळवळ नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आणि महसूल विभागामार्फत चालविण्यात येणारे गाव पातळीवरील पानंद रस्ते या शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक विषयाच्या तत्त्वानुसार सचिव रतिरामजी चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अ -हेरनवरगांव चा विकास करण्यासाठी सर्व गाववासियांनी साथ द्यावी आणि राज्यस्तरावर आपली ग्रामपंचायत प्रथम क्रमांक प्राप्त करु शकेल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.कार्यशाळेचे यशस्वीरित्या नियोजन ग्रामपंचायत कर्मचारी दिवाकर ठेंगरे,सुरज मदनकार,सुरज टेंभुरकार,शैलेश क-हाडे,कावळे बाई यांनी केले.