सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे वडिलांच्या डोळ्यासमोर वाघाने चिमुकल्याला अंगणातून उचलून नेत केले ठार.

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे वडिलांच्या डोळ्यासमोर वाघाने चिमुकल्याला अंगणातून उचलून नेत केले ठार.


एस.के.24 तास


सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.गडबोरी या छोट्याशा गावातील शुभम बबन मानकर वय,8 वर्ष या चिमुकल्याला घराच्या उंबरठ्यावरूनच एका वाघाने उचलून नेले.गुरुवारी रात्रौ 7:30 वा. सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गुरुवारी (दि.18/09/2025 गुरुवार रात्रौ शुभम हा त्याचे वडील बबन मानकर आणि 6 वर्षांच्या बहिणी सोबत गावातील एका कार्यक्रमातून जेवण करून घरी परतले होते.घराच्या अंगणात पोहोचताच,दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शुभमवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून फरफटत नेले. 


वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न आरडाओरड केली.त्यांचा आक्रोश ऐकून गावकरी मदतीसाठी धावले,पण वाघाने शुभमला घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला.जिल्हा परिषद शाळेत 2 री इयत्तेत शिकणाऱ्या शुभमसोबत घडलेल्या या घटनेने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ गावात दाखल झाले आणि जंगलात शोधमोहीम सुरू करण्यात आली,रात्रौ उशिरा पर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेमुळे गावातील प्रत्येक घरातून हळहळ व्यक्त केली जात असून, वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


गडबोरी हे गाव जंगल आणि टेकडीच्या अगदी जवळ वसलेले आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागात वन्यप्राण्यांचा धोका कायम आहे. वाघाच्या दहशतीखालीच येथील लोक रात्र काढतात,अशी व्यथा गावक-यांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !