मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा.
📍तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्राम विकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोवर घेऊन " मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान " तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोवत घेऊन काम करावे, असे आवाहन पंचायत समिती ब्रम्हपुरी चे माजी सभापती रामलाल दोनाडकर यांनी केले.
ब्रम्हपुरी येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" तालुकास्तरीय कार्यशाळा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक क्रिष्णाजी सहारे माजी उपाध्यक्ष जि.प चंद्रपूर हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माजी जि.प.सदस्य प्रा .राजेश कांबळे, माजी जि.प सदस्य . प्रमोद चिमूरकर, माजी जि.प सदस्य श्रीमती दिपालीताई मेश्राम व खेमराजजी तिडके, प्रशासक तथा गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे, बालविकास प्रकल्प अधिकारी राठोड, गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे, वांद्रा ग्रामपंचायतचे सरपंच महादेव मडावी, सुरबोडी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती राधिका बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर पासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ याकालावधीत हे अभियान राबविण्यात येईल. लोकाभिमुख प्रशासन, कर वसुली, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, रोजगार निर्मिती, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर १०० गुणांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन केले.
जाणार आहे असेही ते म्हणाले पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा व अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.यावेळी विस्तार अधिकारी पंचायत मिलिंद कुरसुंगे यांनी पीपीटी च्या माध्यमाने सदर अभियानाचे मार्गदर्शन केले. आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम पंचायत मध्ये जिल्हा स्तरीय उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायत वांद्रा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायत सुरबोडी तसेच कर वसुलीमध्ये 100 टक्के अग्रेसर असणारे ग्रामपंचायती चकबोथली, सुरबोडी, तोरगाव खुर्द व कन्हाळगाव या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे यांनी केले तर संचालन जयेंद्र राऊत विस्तार अधिकारी पंचायत, व आभार निशांत मेश्राम विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप मुकाडे विस्तार अधिकारी कृषी, आदित्य महल्ले विस्तार अधिकारी कृषी, प्रशांत मेश्राम स्था.अभी.रा.ग्रा.स्व.अ.चे तालुका व्यवस्थापक चंद्रकांत वरवाडे, आसेसके तालुका व्यवस्थापक प्रवीण सिडाम
ए.पी.ओ.राजू नागापुरे, संतोष गायकवाड, मीना बारशिंगे, कल्पना पेटकर यांनी सहकार्य केले.सदर कार्यशाळेला संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच उपसरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते असे एकुण ४८८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.