डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात सामाजिक प्रबोधन बैठक समाज उन्नतीसाठी ठराव.
एस.के.24 तास
चामोर्शी : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, तालुका शाखा चामोर्शी च्या वतीने मंजेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे दिनांक,१८ सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6/ 30 वाजता सामाजिक बैठक व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक व राजकीय प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून उपाययोजना ठरवण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा आणि विविध क्षेत्रात अग्रेसर व्हावे,असा ठराव या वेळी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहूर्ले,यांनी तर उद्घाटन किशोर नरुले प्रदेश सचिव यांच्या हस्ते झाले.या बैठकीत माजी, सरपंच तंटामुक्त अध्यक्ष गंगाधरजी रामटेके,तालुका अध्यक्ष परमेश्वर नामदेव मोहुर्ले,
समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना तालुका चामोर्शी,जिल्हा संघटक संजय गोरडवार,ज्येष्ठ सचिव प्रमोद रामटेके,कार्यकर्ते दिलीप मोहुर्ले,अनिल मोहुले,नामदेव मोहुर्ले,दीपक पूजलवार,अशोक देटे, प्रकाश माहुर्ले, सोमेश्वर रामटेके,जितू पुलिवार,नरेश रामटेके,समीर रामटेके, अविनाश रामटेके आदी मान्यवरांची होती.
तसेच महिला बांधव व कार्यकर्त्यांमध्ये जयश्री रामटेके (अंगणवाडी सेविका),रूपा देते,अर्चना गोरडवा,मायाबाई पुलिवार, वैशाली मोहुर्ले, माधुरी देटे,सखुबाई पूजलवर,वनिता मोहुर्ले,मंदाबाई मोहुर्ले आदींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.या कार्यक्रमास समाजातील मोठ्या संख्येने बांधव,भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहून सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला.