मराठ्यांची ओबीसी आरक्षणात घुसखोरी संविधान विरोधी. - समता परिषद व ओबीसी संघटनेचा आंदोलनातून एल्गार
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दहा टक्के ईडब्लूएस मध्ये आरक्षण असताना आता कुणबी नोंदीच्या नावाने मराठयांची ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा झुंडशाही चा डाव सहन करणार नाही असा नारा देत समता परिषद व सकल ओबीसी संघटनेनी " एल्गार" पुकारून आंदोलन करीत मूल तहसील कार्यालयावर धडक दिली.
अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे माफॅत शासनास सादर करण्यात आल्यात.यात 2 सप्टेंबर 2025 चा हैदराबाद गॅझेटचा कलम कसाई शासन निर्णय रद्द करणे, मराठा ही कुणबी नाहीत त्यामुळे यापूर्वीचे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करणे, मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्णय रद्द करणे, जातनिहायक जनगणना करणे, मराठयांनाओबीसी आरक्षणात घुसखोरी करू न देणेया मागण्या रेटण्यात आल्यात.
या आंदोलनाचे नेतृत्व समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी केले. मराठा समाजाला इतर माध्यमातून सवलती मिळत असताना व मराठा जात ही कुणबी नाहीच असे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदी असताना आहेत. मराठा समाज हा मागास नाही म्हणून राज्य सरकारने मराठा जातींना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2019 ला रद्द केले, त्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाने मराठा हे कुणबी नाहीत त्यामुळे त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
तसेच हा समाज प्रगत असून महाराष्ट्रातील दहा लाख नोकऱ्यांमध्ये फक्त मराठा समाजाच्या लोकांना दोन लाख नोकऱ्या मिळालेल्या आहेत तर 19 टक्के आरक्षण असूनही ओबीसींना जेमतेम आठ टक्के म्हणजे 52 हजारच नोकऱ्या मिळालेल्या आहेत. असे परखड निरीक्षण निकालात दिलेले असताना आता हैद्राबाद गॅझेट पुढे करून कुणबी नोंदीच्या नावाखाली ओबीसी आरक्षणात घुसखोरी चा डाव हाणून पाडला जाईल असे या आंदोलनात पदाधिकारी यांनी स्पष्ट केले.
ओबीसीचे राष्ट्रीय नेते ना.छगनजी भुजबळ नेहमी संघर्ष करीत आले आहेत. मराठा समाजाला पुन्हा महायुती सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण हे नोकरी व शिक्षणात दिलेले असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ते ओबीसीतून देऊ नये व घुसखोरी करू नये असा आग्रह निवेदनातून धरण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी झुंडशाहीतून आंदोलने केली आहेत ,यासाठीच मुंबईत बेकायदेशीर आंदोलन झाले. म मुंबईकरांना वेठीस धरून कायदा व नियमांची पायमल्ली करून ओबीसी आरक्षणात समावेश करण्यासाठी सरकारवर दबाव टाकून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती मराठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमली.
मराठा आरक्षण उपसमितीचा सदरचा कलम कसाई जीआर व शासन निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाचे कायदे निकाल बाजूला सारून गावातील कुठल्याही ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही , अशा नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिले तर मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे राज्य स्थापन झालेल्या शासकीय जात पडताळणी समितीचे अधिकारावर अतिक्रमण करून आता गावागावात अशा जाती पडताळणीच्या समित्या स्थापन करून या गावठी समितीच्या शिफारशीवर कुणबी प्रमाणपत्र देणे
संविधान विरोधी असून, त्यामुळे वेगळ्या प्रगत जातीमध्ये लग्न झालेल्या मुलीकडील नातेवाईक एक सुद्धा प्रगत असले तरी त्यांनाही कुणबी ओबीसी प्रमाणपत्र सर्रास मिळू लागतील पुढे सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेतला, तर एस.सी. एस.टी. समाजाच्या आरक्षणात प्रगत जाती ही घुसखोरी करण्यास
मोकळया राहतील. देशाच्या या इतिहासात असा बेकायदेशीर झुंडशाहीला बळी पडून कायदा व संविधानाची अवहेलना करून शासन निर्णय काढला आहे म्हणून हा शासन निर्णय रद्द करावा अशी विनंती निवेदनातून केली आहे.
यावेळी प्रा. विजय लोनबले, सौ. शशिकला गावतुरे, प्रा. रामभाऊ महाडोळे, श्री गंगाधर कुनघाडकर, श्री कैलास चलाख, श्री मंगेश पोटवार, प्रा. किसन वासाडे, श्री निपचंद शेरकी, श्री ओमदेव मोहुलें, श्री चंद्रकांत चटारे, श्री राकेश मोहुलें, श्री निखिल वाढई , श्री सौरभ वाढई, श्री राकेश ठाकरे, सरपंच: श्री.संजय येनुरकर, श्री पालीन्द्र सातपुते, श्री सतीश चौधरी, श्री कालिदास खोब्रागडे, श्री योगेश लेनगुरे.इ. श्री नंदू बारस्कर, श्री गुलाब शेंडे, श्री प्रशांत भरतकर, श्री ईश्वर लोणबले, श्री बादल करपे, श्री गुरुदास गिरडकर, डॉ.
आनंदराव कुडे श्री संदीप मोरे, श्री टेकचंद महाडोळे, श्री राजेश्वर मोहुलें, श्री किशोर राऊत ,श्री पंकज चौधरी ,श्री विजय नागोसे, श्री विक्रम गुरनुले श्री विनोद आंबटकर, प्रा. दिलीप वारजूरकर, डॉ. केवल कराडे, श्री सुरेश संगोजवार, श्री परशुराम शेंडे श्री दादाजी येरणे , श्री.दिलीप लेनगुरे, राजेंद्र वाढई
श्री राजेंद्र मोहुलें, श्री प्रदीप वाढई, श्री जयंत लोणबले, श्री नामदेवराव गावतुरे श्री भास्कर शेंडे श्री गिरीधर चौधरी श्री भैय्याजी मोहरले श्री बंडू मांदाळे, श्री अंकुश नागोसे श्री पुनेश्वर वाढई, विपुल वाढई, प्रवीण लोणबले, स्वप्निल बुरांडे, आशिष वासेकर, श्री तुकाराम गुरनुले, संजय मोहरले, प्रज्वल लोणबले,-आंदोलनात सहभागी महिला सौ.मीराताई शेंडे , सौ. सीमाताई लोनबले,
सौ.रत्नाताई चौधरी, सौ.शामलताई बेलसरे , सौ.सविताताई जेंगटे,कु.कुमुदिनी भोयर, सौ. उषाताई चुधरी, सौ उषाताई शेंडे, सौ. नंदाताई शेंडे, सौ. शुभांगी शेंडे,सौ.कल्पना लेनगुरे, सौ.लताताई बोरुले,सौ.शीलाताई गुरनुले,सौ. कल्पना कराडे ,सौ. माधुरी कोटरंगे,सौ. जोशना दोडके, सौ.गंगा मोहरले,सौ. उमाताई कोटरंगे तसेचसमता परिषदेचे पदाधिकारी व ओबीसी संघटना पदाधिकारी , सरपंच तथा ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.