अखेर धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला पकडून केले जेरबंद.
📍विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली संपूर्ण टीमला यश.
एस.के.24 तास
सावली : दिनांक: मागील दीड महिन्यापासून सावली वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला आज दिनांक,7/9/2025 रोजी साय.5.02 वा.वनविभागाचे संरक्षित वन कक्ष क्रमांक 1662 मध्ये जेरबंद करण्यात आले.
सदरची मोहीम श्री.रामानुजम,मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, राजन तलमले,विभागीय वन अधिकारी चंद्रपूर यांचे नेतृत्वात, विकास तरसे,सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर,विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात अक्षय नारनवरे जीवशास्त्रज्ञ, नंदकिशोर पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी,अनिल मेश्राम व वनरक्षक नान्हे, खुडे, कराड,नागोसे,आदे, आखाडे,बोनलवार,
मुरकुटे, बोरकर, अहिरकर,सोनेकर,डांगे, महादेव मुंडे, अतीन मानकर, पीआरटी चमू निफंद्रा, खानाबाद, व करगाव यांचे सहकार्याने पार पडली. डॉ. कुंदन पोडचेलवार TTC चंद्रपूर, घनश्याम नायगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर व RRU टीम चंद्रपूर यांनी सदर वाघिणीस जेरबंद केले.


