श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक,14 सप्टेंबर 2025 ला 350 रुग्णांनी श्रीधाम मल्टी थेरेपी हॉस्पिटल अँड रिसर्च प्रा. ली. श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे श्री. डॉ. विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. उद्घाटक डॉ.विपुल पाटील पुलगाव प्रमुख पाहुणे.श्री.अमोल भाऊ येसन कर पत्रकार डॉ.आलोक बिस्वास श्री रवि धांदे पोलिस पाटील बोरगाव धांदे श्री. चंदू भाऊ राऊत श्री.जयवंत नाचणे यांच्या हस्ते मोफत कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले.
राजस्थान औषधालय प्रायव्हेट लिमिटेड मुंबई डीपी आयुर्वेदा मेडिसिन पुलगाव आयुष आयुर्वेदिक कंपनी अमरावती कृषी आयुर्वेदा यवतमाळ श्री प्रमोद धांडे आयुर्वेदा मेडिसिन वर्धा श्री निलेश जी तांबेकर यवतमाळ श्री लोकेश जी पवार प्रमोद जी ठाकरे श्री गुरुदेव आयुर्वेदा अमरावती निखिल वर्मा आयुर्वेदा मेडिसिन अमरावती अनिल जी पोटोडे श्री गुरुदेव आयुर्वेदा आष्टी.
सांडू आयुर्वेदा यवतमाळ गजानन आयुर्वेदिक औषधे यवतमाळ त्यांनी मोफत कॅम्प मध्ये सहकार्य केलेले तसेच राजस्थान औषधालय प्रा लि मुंबई यांच्यामार्फत व्यसनमुक्ती वेदना व्यवस्थापन सांधेदुखी संधिवात गुडघेदुखी मनकेदुखी इत्यादी आजारावर शंभर रुग्णांना मोफत मेडिसिन दिलेली आहेत. या मोफत आरोग्य तपासणी शिबिर मध्ये यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया व बोरगाव धांदे भातकुली विटाळा पुलगाव सौजना पाच खेड येथील रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे.
तसेच महानुभाव पंथातील संत महंत भिक्षुक वासनिक वर्धा यवतमाळ नागपूर येथील या मोफत मेडिकल कॅम्प लाभ घेतलेला आहे. मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे व वृद्धाश्रम आपटी फाटा यांनी सुद्धा मोफत मेडिकल कॅम्पचा लाभ घेतलेला आहे बोरगाव धांदे येथील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री.अनिल कराळे श्री लखन सवाळे श्री गजानन कलुके श्री किसनराव उइके श्री. चापले व गावातील नागरिकांनी मोलाची सहकार्य केले.शेवटी डॉ.विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून व 350 रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी करून मोफत आयुर्वेदिक औषधी देण्यात आली.
आयुर्वेदिक औषधी कंपनीने जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.तसेच यापुढे सुद्धा असेच मोफत मेडिकल कॅम्प दर महिन्याला घेण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पुन्हा सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

