108 गावातील जनता 5 हजार पेक्षा जास्त संख्येने रस्तारोको आंदोलन.
📍जनतेचा एकच मागणी आहे " वीज नाही तर बिल नाही " हा निर्धार घेऊन महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
एस.के.24 तास
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर येथे मागील 15 वर्षांपासून मंजूर असलेला 33/11 केव्ही उपकेंद्रा चे बांधकाम सुरु करण्यात न आल्याने कसनसूर येथे आज दिनांक 8/10/2025 रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी वेन्हारा ईलाका,रोपी बारसा ईलाका समितीचे अध्यक्ष,सचिव व सर्व पदाधिकारी तसेच कसनसूर परिसरातील 11 ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वात भव्य चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील कसनसुर हे परिसर अतिशय नक्षलग्रस्त क्षेत्र असून छतीसगड राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी वारंवार विदयुत खंडित होत असल्याने 108 गावातील जनता 5 हजार पेक्षा जास्त संख्येने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. जनतेचा एकच मागणी आहे " वीज नाही तर बिल नाही " हा निर्धार घेऊन महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदनात म्हटले आहे.
की जो पर्यंत 33/11 केव्ही उपकेंद्र चा बांधकाम करीत नाही तोपर्यंत लाईट बिल भरणार नाही. यावेळी कोतुराम पोटावी ईलाका अध्यक्ष,देविदास मट्टामी ईलाका सचिव तथा उपसरपंच ग्रामपंचायत मानेवारा,दशरथ पोटावी ईलाका उपाध्यक्ष, चंदु मट्टमी ईलाका उपाध्यक्ष,विलास कोंदामी ईलाका कोषअध्यक्ष तथा सरपंच वाघेझरी
कमल हेडो ईलाका महिला अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत कसनसूर, सुधाकर गोटा ईलाका माजी अध्यक्ष, राजु गोमाडी ईलाका माजी सचिव,नितीन दादा पदा ग्रामसभा कार्यकर्ते,मैनु लेकामी व्यवस्थापण अध्यक्ष,दामजी हिचामी उपसरपंच जवेली बु.अलिशा गोटा सरपंच जवेली बु., महादेव पदा उपसरपंच कोटमी,सिंधू मुहंदा सरपंच कोटमी, साधू कोरामी सरपंच घोटसूर
मुन्ना पुंगाटी जवेली खुर्द,प्रकाश पुंगाटी सामाजिक कार्यकर्ते, सुनील मडावी सदस्य, नांगसू गावडे सह कोष, सुरेश कोला सहसचिव, दुलसा गावडे, गंगाराम ईशटम, बाबुराव पुंगाटी उपसरपंच सेवारी, लालसू नरोटे सदस्य, देवाजी तिम्मा सदस्य, नरेश नरोटे घोटसूर पाटील, पुसू गावडे सदस्य, देवू गावडे सदस्य, विकास झोरे सदस्य, बुधु पोटावी तसेच प्रत्येक गावातील पाटील, व गावातील सर्व महिला, पुरुष असे 5 हजार पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते.