बोलीमहर्षी डॉ.बोरकरांतर्फे 33 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.खानोरकरांचा सन्मान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
दिनांक,30/10/2025 33 वे झाडी बोली साहित्य संमेलन पोर्ला येथे डिसेंबर २०२५ च्या अखेरीस होणार आहे.झाडी बोली वर्धापन दिनानिमित्त झाडी बोलीतील प्रसिद्ध कवी, ललित लेखक, पत्रकार डॉ धनराज खानोरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी त्यांनी घोषित केले आहे.हा बहुमान यावेळी ब्रह्मपुरीच्या लेखकाला मिळाला.
नियोजित अध्यक्षाचा सत्कार झाडी बोली चळवळीचे सर्वेसर्वा डॉ हरिश्चंद्र बोरकरांनी एका कार्यक्रमाच्या घडवून आणला. यावेळी डॉ.धनराज खानोरकररांसोबत डॉ.माधव कांडणगिरे,प्रा मंगेश जमदाडे आणि सुधिर बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

