विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर तर्फे डॉ .चंद्रहास्य नंदनवार यांचा सत्कार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३१/१०/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील डॉ.चंद्रहास्य मोतीलाल नंदनवार यांनी जागतिक पातळीवर अभिमानास्पद यश संपादन केले.अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हिअर प्रकाशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचा नाव समाविष्ट केला.
भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या कार्याचा ठसा उमटविल्यामुळे विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या संशोधकांच्या सत्कार समारंभात डॉ.चंद्रहास्य नंदनवार यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच नागपूरचा गौरव विज्ञानरत्न या पुस्तिकेत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.यावेळी नागपूरचा गौरव विज्ञानरत्न या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.सदर सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अतुल वैद्य कुलगुरू लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, प्रमुख अतिथी प्रा.डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख सल्लागार कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,कराड,
नीरीचे संचालक डॉ.व्यंकट मोहन, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि इतर संशोधकांच्या उपस्थितीत डॉ.चंद्रहास्य नंदनवार यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाने त्यांनी गावपातळीवरून विदर्भ, महाराष्ट्र, देश आणि वीदेशात आपल्या कीर्तीचा,गुणाचा, संशोधक जिद्दीचा झेंडा उंच केला आहे.
विदर्भातील खेडेगावातून आलेले डॉ.चंद्रहास्य नंदनवार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला तरुण संशोधक म्हणून नावलौकिक केला.ते सर्व तरुण नवसंशोधकांसाठी मॉडेल रोल ठरलेले आहेत असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अतुल वैद्य यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.


