दसरा गेला,दिवाळी संपत आली तरी वनविभागातील मजुरांचे रोजंदारी वेतन 7 महिन्यापासून टप्प.
📍रोजंदारी वन कर्मचाऱ्यावर उपासमारीचे संकट ; जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या वन मजूरावर सरकार चे दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील शासकीय कार्यालयातील काम करणाऱ्या मजुरांचे वेतन दसरा गेला,दिवाळी संपत आली मागील 7 महिन्यापासून वेतन रोजंदारी कर्मचाऱ्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे वन विभागात वनमजूर,संगणक परिचालक,प्राथमिक कृती दल, बिट मदतनीस,रोजंदारी कामगार म्हणून मागील अनेक वर्षापासून काम करीत आहेत.
सावली तालुक्यात पाच वनपरिक्षेत्रात पीआरटी संख्या जवळपास 150 हून अधिक संगणक परिचालक जवळपास पाच ते दहा वनमजूर व बिटमजूर जवळपास 50 ते 55 असून सर्व मजुरांचे मानधन थकले आहे. वनविभागाच्या मजुरांची मानधन अभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व रोजंदारी मजूर मानधन मिळवण्याच्या प्रतीक्षेत होते.
दसरा गेला,दिवाळी संपत आली मागील 7 महिन्यापासून वेतन रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यामुळे आर्थिक संकटात भर पडली. या मानधनातून मजुरांचा घरगुती खर्च मुलांच्या शिक्षणावर खर्च आरोग्यावरील खर्च भागवा लागतो त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण तणाव निर्माण झाला आहे.
मजुरांचा रोष वनपरिक्षेत्र अधिकारी व क्षेत्र सहाय्यक यांना सुचवा लागत आहे याबाबत मजुरांची तीव्र संताप व्यक्त केला आहे दिवाळीपूर्वी मजुरी देण्यात यावी अशी मागणी मजुरांनी केली होती परंतु दसराई गेला दिवाळी संपत आली तरी पण मानधन मिळालेला नाही.
शासनाकडून निधीचा आला नाही असे अधिकारी सांगत आहेत.
वन मजुरांकडून करण्यात आलेले कामे आटोपूण सात महिन्याचा कालावधी लोटला परंतु काम करणाऱ्या वनमजुरांना अजूनही मजुरी मिळाली नाही याचा निधी शासनाने पाठवला नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. काम करून मजुरी मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा हा मोठा गोरगरीब वन मजुरांना प्रश्न पडला आहे.
या संदर्भात वनमजूर संघटना वारंवार शासन प्रशासन व वन विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत मात्र केव्हा न्याय मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एप्रिल महिन्यापासून वनमजुरांची मजुरी शासनाकडून अद्याप प्राप्त न झाल्याने मजुरांचे मानधन थकले आहे. थकीत मजुरी व मानधन संदर्भाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा व वारंवार निधीची मागणी करीत सातत्याने मजुरी संदर्भाने स्वतः आपल्या स्तरावरून पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. - विनोद धुर्वे,वनपरिक्षेत्र अधिकारी सावली

