मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत येवली येथे अभ्यासिका (वाचनालय) द स्टडी सर्कल नावाने उदघाट्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 21/10/2025 रोज मंगळवार ला दिवाळी सणाच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत येवली कडून मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत मौजा येवली येथे अभ्यासिका (वाचनालय ) द स्टडी सर्कल नावाने उदघाटन केले आहे.
या प्रसंगी उदघाटक अध्यक्ष श्री.युवराजजी भांडेकर सरपंच, प्रमुख अतिथी म्हणून श्री.श्रीकांतजी कुत्तरमारे सर,प्रमुख मान्यवर श्री प्रीतमजी गेडाम उपसरपंच,श्री चोखाजी बांबोळे सदस्य,श्री रुमाजी भांडेकर सदस्य,सौ किरणताई चचाने सदस्य , सौ कविताताई गेडाम सदस्य,सौ विठाबाई भांडेकर सदस्य,
श्री.महेंद्रकुमार मोहुर्ले ग्रामपंचायत अधिकारी, श्री आशिष कंठीवार संगणक परिचालक, सौ. लक्ष्मीछाया मेश्राम पोलीस पाटील, श्री नरेशजी कंदीकुरवार तंटामुक्त अध्यक्ष, श्री चोखाजी भांडेकर शिक्षक व गावातील गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच वाचनालय विद्यार्थी उपस्थित होते.

