मुख्यालयातील पोलिस शिपायाकडून तरुणीचा लैंगिक शोषण पोलिस शिपाई फरार.
📍तीन आठवड्यांपूर्वी तरुणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली पण पोलिस स्टेशन मधून परत पाठवले शेवटी...
📍खाकी वर्दी आधीच डागाळली असताना त्यातून कसलाही धडा न घेतलेल्या पोलीस दलातील आणखी एक प्रकरण समोर.
एस.के.24 तास
नागपूर : सातारातल्या फलटणमधील महिला डॉक्टरचा लैंगिक छळ आणि आत्महत्येचे हे प्रकरण ताजे असताना आता असाच प्रकार नागपुर मध्ये ही उघडकीस आला.एका 23 वर्षीय तरुणीने पोलीस शिपायावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा शिपाई मुख्यालयात कर्तव्यावर तैनात आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तो आपल्यावर दिड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार तरुणीने पोलीस आयुक्तालयांकडे केली आहे. या प्रकरणी तीन आठवड्यांपूर्वी ही तरुणी पोलीस ठाण्यात फिर्यादही घेऊन गेली होती.
तिला ठाण्याने पिटाळून लावले.त्यानंतर तरुणीने पोलीस आयुक्तालयांकडे दाद मागितली.आयुक्तांनी हे प्रकरण भरोसा सेलकडे पाठवले.तेथेही तडजोड न झाल्याने अखेर तरुणीच्या तक्रारीवरील कपीलनगर पोलिसांनी पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केले.
साताऱ्यातल्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची तरुणीने आपल्या हातावर लिहीली. पोलीस उपनिरीक्षक बदणे याने चारवेळा आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता.खाकी वर्दी आधीच डागाळली असताना त्यातून कसलाही धडा न घेतलेल्या पोलीस दलातील आणखी एक प्रकरण समोर आले.
उमेश शेळके वय,26 वर्ष असे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेल्या नागपूर पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपायाचे नाव आहे. पोलीस लाईन टाकळीत एका खानावळ चालवणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून उमेश शेळके गेल्या काही दिवसांपासून शोषण करत होता.मूळचा वाशीम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातील रहिवासी असलेला उमेश हा दोन वर्षांपुर्वी पोलीस दलात दाखल झाला.त्याची नियुक्ती पोलीस मुख्यालयात करण्यात आली.
गोरेवाडातल्या दत्त नगरातील भाड्याच्या खोलीत राहणारा उमेश हा पोलीस दलात रुजू झाल्यापासून एका खाणावळीवर नियमीत जेवायला जात होता. तिथेच त्याची मेस चालवणाऱ्या तरुणीसोबत ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यातून दोघांमध्ये शारिरीक संबंधही निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून उमेश तिच्याशी संबंध ठेवून होता.
मुलीने लग्नासाठी दबाव टाकला असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे तरुणीने पोलीस ठाणे गाठत 6 ऑक्टोबर ला त्याची तक्रार केली. पोलीस उमेशवर कसलीही कारवाई करत नसल्याने तरुणीन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्याकडे तक्रार केली.
त्यांनी हे प्रकरण भरोसा सेलकडे पाठवले. सेलने दोघांचेही समुपदेशन केल्याने काही दिवसांसाठी तडजोड झाली. मात्र त्यानंतरही उमेश लग्नास तयार होत नसल्याने अखेर प्रकरण कपीलनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
पोलीसांनी उमेशवर गुन्हा दाखल केला. याची कुणकूण लागलाच उमेश शेळके फरार झाला.त्याने दोन दिवसांपूर्वी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लागला.या घडामोडीत कपिलनगर पोलिसांनी उमेशचे मूळ गाव आणि त्याच्या बहिणीचे घर पुसद येथेही पथक पाठवून शोध घेतला.उमेश सापडला नाही. सध्या तो फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

