गडचिरोली तालुक्यातील गाव निहाय शेतीचे सर्वे करून प्रति हेक्टर 20,000 मदत द्या. - फुलचंद वाघाडे यांची सागर पाटील तहसीलदार गडचिरोली यांना विनंती.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील टेंभा,चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब,बेलगाव, मुरमाडी,गिलगाव, मुरुमबोडी- बोथेडा, आंबेशिवाणी,आंबेटोला,भिकारमौशी, अमिर्झा व इतर गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीचे गाव निहाय शेतीचे सर्वे करून प्रति हेक्टरी ₹ 20,000 (वीस हजार रुपये) मदतीची मागणी फुलचंद वाघाडे यांनी तहसीलदार गडचिरोली यांना केली आहे.
जेणेकरून त्यांना झालेले मोठे आर्थिक नुकसान भरून काढता येईल.पावसामुळे झालेल्या भातपिकाचा १००% शेतीचा सर्व्हे आवश्यक आहे.पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करताना कोणताही भेदभाव न करता १००% शेतीचा सर्व्हे करण्यात यावे.
अनेकदा वैयक्तिक पंचनामे व्यवस्थित होत नाहीत किंवा सरसकट पंचनाम्यामध्ये प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीपेक्षा खूप कमी मदत मिळते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यांचे हजारोंचे नुकसान झाले असताना त्यांना केवळ काही शेकडो रुपयांची मदत मिळाली आहे,जी अत्यंत अपुरी आहे.
शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी केलेला खर्च आणि झालेले उत्पन्न, त्यामुळे झालेले नुकसान पाहता,सरकारने तत्काळ हेक्टरी ₹ 20,000 मदत जाहीर करावी. - फुलचंद वाघाडे

