अ-हेरनवरगांव येथे सरपंचा दामिनी चौधरी यांनी केले विविध कामांचे भूमिपूजन.

अ-हेरनवरगांव येथे सरपंचा दामिनी चौधरी यांनी केले विविध कामांचे भूमिपूजन.


अमरदीप लोखंडे,सहसंपादक. 


ब्रम्हपुरी - ०४/११/२५ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान व राष्ट्रीय ग्रामीण हमी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ग्रामपंचायत भवन व कामन सर्विस सेंटर बांधकामाचे भूमिपूजन सरपंचा दामिनी चौधरी यांनी केले.



या वेळी ग्रामपंचायत अधिकारी रतीराम चौधरी, उपसरपंच जितेंद्र क-हाडे, सदस्य चंद्रकांत गाताडे, सदस्या सुनीता मडावी,शिपाई वंदना कावळे,माजी सैनिक सुभाष ठेंगरे, अमरदीप लोखंडे,होमराज राऊत अध्यक्ष तंटामुक्ती ,पोलीस पाटील अकुल राऊत,लिपिक दिगांबर ठेंगरे, जागेश्वर चौधरी, माजी सरपंच गोवर्धन बागडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मयूर चिचमलकार उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संगणक आपरेटर शैलेश क-हाडे,सुरज मदनकर, सुरज टेंभुरकर, सुरज वैद्य, रजत वैद्य, व इतर ग्रामपंचायत कर्मचारी व वाचनालयातिल विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून लवकरच आचारसंहिता लागणार या दूरदृष्टीने गावाचा विकास न थांबता विकास व्हावा यासाठी इतर बांधकामाचे सुद्धा भूमिपूजन गावातील वेगवेगळ्या वार्डात जाऊन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !