सावली ते गडचिरोली महामार्गांवर हिरापुर टोल नाक्याजवळ अपघात.
📍दुचाकीस्वार जागीच ठार ; ट्रक चालक फरार.
एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० वरील हिरापुर टोल नाक्याजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात ट्रक चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला कोणतीही काळजी न घेता उभा केला होता.
या वेळी कुमोद धनराज मेश्राम रा. रानमुल, ता. गडचिरोली हे एम.एच. ३३ एजे १०४७ या दुचाकीवरून जात असताना ट्रकला मागून धडक देऊन गंभीर जखमी झाले.त्यांना उपजिल्हा रुग्णालय,मूल येथे नेण्यात आले, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्याविरुद्ध कलम २८५, १०६(१) सहकलम ११९, १२२ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सावली पोलीस करत आहे.

