युवक काँग्रेस शहर अध्यक्षाची धुरा मिथुनसिंग पटवा यांच्यावर.
📍संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखेची अंतिम घोषणा झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांसह मिथुन सिंग पटवा यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन नीलमवार यांनी संतोष सिंह रावत यांच्या निर्देशानुसार मिथुन सिंग पटवा यांची युवक काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मिथुन सिंग पटवा यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता बसवण्यासाठी युवकांनी परिश्रम घ्यावे कारण काँग्रेसच युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो असे मत संतोष सिंह रावत यांनी व्यक्त केले.
पक्षप्रवेश कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले,शहर काँग्रेस अध्यक्ष सुनिल शेरकी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, युवक काँग्रेसचे पवन नीलमवार, प्रशांत उराडे,आकाश दहिवले, तथा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


