वनविभागाच्या हद्दीत गुरवळा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या गुरवळा नेचर सफारीचा शुभारंभ. 📍नेचर सफारीतून वाघ,बिबट, अस्वलांसह विविध प्राण्यांचे दर्शन होणार ; चौदाहून अधिक प्रकारच्या पशु - पक्ष्यांचा संचार.

वनविभागाच्या हद्दीत गुरवळा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या गुरवळा नेचर सफारीचा शुभारंभ.


📍नेचर सफारीतून वाघ,बिबट, अस्वलांसह विविध प्राण्यांचे दर्शन होणार ; चौदाहून अधिक प्रकारच्या पशु - पक्ष्यांचा संचार.


एस.के.24 तास


गडचिरोली : वनविभागाच्या हद्दीत गुरवळा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या गुरवळा नेचर सफारीचा शुभारंभ शनिवार,22 नोव्हेंबर 2025 रोजी मा.उपवनसंरक्षक व्ही.एस.आर्या यांच्या हस्ते पार पडला.नेचर सफारीतून वाघ,बिबट,अस्वलांसह विविध प्राण्यांचे दर्शन घेता येणार आहे.


नेचर सफारीच्या समारंभाला सहायक वनसंरक्षक प्रवीण पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर,गुरवळा च्या सरपंच जया मंटकवार आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम यांच्यासह क्षेत्र सहायक जे.एन.सोरदे,पी. यू.गेडाम,ए.ए.दंडेवार,एस.एम.पेंदोरकर तसेच वनरक्षक पी.एम. मेश्राम,पी.एम.अल्लीवार,सिद्धार्थ मेश्राम,दिगंबर टेकाम,एन. एन.भरे,सुनंदा मडावी यांसह वनकर्मचारी उपस्थित होते.नेचर सफारीत भ्रमंतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.


📍चौदाहून अधिक प्रकारच्या पशु - पक्ष्यांचा संचार : -


निसर्ग पर्यटन आणि इको - टुरिझमला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सफारीमुळे पर्यटकांना स्थानिक जैवविविधता,वन्यप्राणी, पक्षी, हिरवाईने नटलेले जंगल आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सफारीत वाघ,बिबट,अस्वल यांसह तृणभक्षी विविध 14 प्रकारच्या पशु - पक्ष्यांचा संचार आहे.

गुरवळा नेचर सफारीत वनविभागातर्फे सफारी मार्ग,सुरक्षा, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि अन्य सुविधा यांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे.सफारीमुळे वनसंरक्षण,पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांचा सहभाग अधिक मजबूत होईल. - व्ही.एस.आर्या,उपवन संरक्षक,वनविभाग,गडचिरोली







#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !