10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली येथे महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा संपन्न.

10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने मानवाधिकार संघटनेच्या वतीने गडचिरोली येथे महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली येथील नवेगाव कॉम्प्लेक्स येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका समोरील मैदानावर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन निमित्ताने महिला जागृती कार्यक्रम व कर्तबगार महिलांचा संघटनेत भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष,नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघ




उदघाटक,मा.प्रशांतजी वाघरे.माजी जिल्हाध्यक्ष भाजपा. मा. प्रकाशजी गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा सह.उदघाटक - चंदाताई कोडवते भारतजी खटी.प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.प्रमुख पाहुणे डॉ.प्रणय जी खुणे -प्रदेश अध्यक्ष. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.राज्य उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे. सामाजिक कार्यकर्ते विकासजी वडेट्टीवार.धम्म दीप बोदेले.संजय बारापात्रे.अखिल तायडे.रमेश अधिकारी जिल्हा अध्यक्ष.


राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी.कार्याध्यक्ष मंजुषाताई आत्राम.उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये. किशोर कुंडू. दीपक सातपुते.तालुका सचिव दिनेश मुजुमदार संतोष बुरांडे.लक्ष्मीताई कन्नाके, सचिव तेजस्विनी भज्जे,कोषाध्यक्ष जाहेदा शेख, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी आत्राम,गडचिरोली तालुका शहराध्यक्ष स्नेहल मेश्राम.भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष. शहर सचिव राणी गोपशेट्टीवार. शहर प्रवक्ता शीतल मेश्राम उपस्थित होते.


उपस्थितांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव उसेंडी. उद्घाटक प्रशांत वाघरे. प्रकाश गेडाम. सह उदघाटक चंदाताई कोडवते. भारत खटी. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे सामाजिक कार्यकर्ते धम्मदीप बोदेले व संघटना पदाधिकारी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले. गडचिरोली शहरातील महिला सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत कार्य करण्याची इच्छा आहे अशा शेकडो महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश केला. 


व उपस्थित मान्यवर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने संघटनेचा सन्मान दुपट्टा देऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश दिला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवेगाव कॉम्प्लेक्स येथील स्थानिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते व वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका येथील विद्यार्थी,विद्यार्थिनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !