बौध्दिक संपदा नोंदणी हे राष्ट्रहिताचे अँड.धिरज अलगदेवे एकदिवसीय कार्यशाळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : आज बौध्दिक संपदेच्या बाबतीत आपण ३२ क्रमांकावरुन ०६ क्रमांकावर पोहोचलो आहोत.बौध्दिक संपदेचे अधिकार मिळविणे व त्याविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करणे काळाची गरज आहे.बौध्दिक संपदा नोंदणी केल्यानंतर तुमचा तर सन्मान होतोच पण ते राष्ट्रहितासाठी अतिशय महत्वाचे असते " असे महत्वपूर्ण विवेचन अँड.धिरजकुमार अलगदेवे यांनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात'आय क्यू ए सी'अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेत ' बौध्दिक संपदा अधिकार 'विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,डॉ.किशोर नाकतोडे,डॉ रेखा मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,डॉ अरविंद मुंगोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अँड.अलगदेवेंचा सत्कार करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.शेकोकर म्हणाले की, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वस्तू वापरतो त्या अधिकारनिर्मित असतात. महाविद्यालयीन स्तरावरुन प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी असे काहीतरी नविन संशोधन करुन हा बौध्दिक संपदेचा अधिकार प्राप्त करुन घ्यावा,असे विचार मांडले.
कार्यशाळेचे समन्वयक डॉ युवराज मेश्राम यांनी प्रास्ताविक केले.संचालन डॉ किशोर नाकतोडे तर आभार डॉ अरविंद मुंगोलेंनी मानले. कार्यशाळेला समस्त प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


