चामोर्शी शिक्षक पतसंस्थेत लाखोचा भ्रष्टाचार उघडकीस ; संस्थेतील लाखोंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर सहकार कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाही करावी.
📍संस्थेतील सर्व सामान्य सभासदांना न्याय मिळवून द्यावा ; अन्यथा दिनांक.२६/१२/२०२५ रोजी आपल्या कार्यालयापुढे सचिन भास्कर कुलसंगे व इत्तर ४५ जण बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा.
एस.के.24 तास
चामोर्शी : सविस्तर वृत्त असे की,नुकतेच दि. १४/०९/२०२५ ला पार पडलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,चामोर्शी/मुलचेरा च्या ४४ व्या आमसभेत श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी वर्ष २०२३ - २४ ला भेटवस्तू खरेदी केलेली व ४४ वा वार्षिक अहवाल पुस्तिकेत जमा खर्च प्रत्रक दि. ०१/०४/२०२४ ते दि. ३१/०३/२०२५ पृष्ठ क्रमांक १२ वरील अनु क्र. ३५, सभासद भेटवस्तू खरेदी १३,९५,०००/- रुपयाची
१) भेट वस्तू खरेदीचे कोटेशन जाहिरात दिल्याबाबत माहिती.
२) कोटेशन कोणकोणत्या पुरवठादाराकडून मागणी करण्यात आली व त्यासबंधी त्यांना दिलेले संस्थेचे पत्र यांची साक्षांकीत प्रत.
३) कोटेशन सादर केलेल्या पुरवठादाराच्या कोटेशन किंवा पत्राची साक्षांकित प्रत.
४) प्रत्यक्ष वस्तू प्राप्त झालेल्या व गॅरेज मधून आलेल्या बील T ची साक्षांकित प्रत.
५) सदर वस्तूची नोंद स्टाक रजिस्टर वर घेण्यात आले यासंदर्भात स्टाक रजिस्टर वरील पानाची साक्षांकीत प्रत.
६) प्रत्यक्ष सभासदांना वितरित करण्यात आलेली वस्तू संदर्भात वितरण रजिस्टरची साक्षांकीत प्रत.
७) भेटवस्तू खरेदी बाबत मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,चामोर्शी यांची पुर्वपरवानगी घेतलेल्या पत्राची साक्षांकित प्रत इ,दस्तऐवजाची सत्यप्रत १५ दिवसापर्यंत प्राप्त करून देण्याबाबत विनंती अर्ज केला होता.व माहिती देण्यासंबंधी सर्वानुमते ठराव घेण्यात आले होते.परंतु आजतागायत 85% माहिती प्राप्त सबंधित माहिती प्राप्त झालेली नाही.तसेच श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी दि.१/१०/२०२५ ला ४४ व्या वार्षिक आमसभेच्या इतिवृत्ताची साक्षाकीत प्रत मिळणेबाबत लेखी अर्ज केला होता.
सदर पत्राच्या अनुशंघाने त्यांना दि. २०/१०/२०२५ ला ४४ व्या वार्षिक आमसभेच्या इतिवृत्ताची soft copy प्राप्त करून देण्यात आली. सदर आमसभेच्या इतिवृत्ताचे अवलोकन केले असता अध्यक्षाच्या परवानगीने येणाऱ्या विषयात ठराव क्र. १२/२ मध्ये मागील वर्षीच्या भेटवस्तूची सर्व दस्तऐवज सादर करणे बाबत आमसभेत १५दिवसाचे आत सबंधित मागील वर्षीच्या भेटवस्तूची सर्व दस्तऐवजांच्या साक्षांकित प्रती प्राप्त करून देण्यात येईल असा ठराव घेण्यात आला होता.
परंतु अध्यक्षांनी १ महिन्याचे आत सबंधित मागील वर्षीच्या भेट वस्तूची सर्व दस्तऐवजांच्या साक्षांकित प्रती प्राप्त करून देण्यात येईल असा ठराव आमसभा इतिवृत्तात लिहिले व सभासदास पतसंस्थेकडून लेखी माहिती हवी असल्यास १००/- रु.च्या Stamp पेपर वर हमीपत्र लिहून देण्यात यावा असा बेकायदेशीर ठराव घेऊन प्रत्यक्ष आमसभेत ठराव घेतल्याप्रमाणे माहिती उपलब्ध करून न देता प्रतिज्ञापत्र लिहून देण्याबाबत श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांना लेखी पत्र दिलेला आहे.
अर्थातच अध्यक्ष महोदयांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था,अधिनियम १९६० कलम ३२ चे उल्लघन करून सभासदाच्या हक्काची पायमल्ली करून मनमानी केलेली आहे.तसेच श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी दि.१६/१०/२०२५ ला पतसंस्थेत लेखी अर्ज करून
१)भेटवस्तू खरेदी बाबत मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांनी परवानगी दिलेल्या अटी व शर्ती ची पूर्तता केल्या बाबतचे संस्थेचे पत्र साक्षांकित प्रत
२) दि. १४/०९/२०२५ ला नुकतेच पार पडलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,चामोर्शी./ मुलचेरा यांच्या ४४ व्या वार्षिक आमसभेच्या इतिवृत्ताची साक्षाकीत प्रत.
३) सन २०२३-२४ जमा खर्च पत्रक क्र.३६ खर्च रु. १९,८०,७५०/- या भेट वस्तू खरेदी बाबत खरेदीचे कोटेशन बाबत जाहिरात माहिती.
४) सन २०२३-२४ कोटेशन कोणकोणत्या पुरवठादाराकडून मागणी करण्यात आली व त्यांना दिलेले संस्थेचे पत्र यांची साक्षांकीत प्रत.
५) सन २०२३-२४ कोटेशन सादर केलेल्या पुरवठादाराच्या पत्राची साक्षांकित प्रत.
६) सन २०२३-२४ प्रत्यक्ष वस्तू प्राप्त झालेल्या व गॅरेज मधून आलेल्या बील T ची साक्षांकित प्रत.
७) सन २०२३-२४ सदर वस्तूची नोंद स्टाक रजिस्टर वर घेण्यात आले किंवा नाही यासंदर्भात स्टाक रजिस्टर.
८) सन २०२३-२४ प्रत्यक्ष सभासदांना वितरित करण्यात आलेली वस्तू संदर्भात वितरण रजिस्टर
९) सन २०२३-२४ भेटवस्तू खरेदी बाबत मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांची पुर्वपरवानगी घेतलेल्या पत्राची साक्षांकित प्रत
१०) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ताळेबंध पत्रकात पान क्र १९ वर नमूद केलेल्या सभासद अनामत खाते रु.८,५८,०४४/- व गैरसभासद अनामत खाते रु. १४,३५,७३६/- या खात्याची यादी मिळणे.
११) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ताळेबंध पत्रकात पान क्र १९ वर नमूद केलेल्या सस्पेन्स बँक अनामत रु. ८,०९,९८७/- या खात्याची माहिती (यादी) मिळणे.
१२) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ताळेबंध पत्रकात पान क्र १९ वर नमूद केलेल्या सभासद चेक कलेक्शन खाते जमा ४६,९०२/- न केल्याची माहिती मागण्यात आली मात्र सदर माहिती अध्याप श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांना प्राप्त झालेली नाही.या बाबत श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांना लेखी तक्रार मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,चामोर्शी यांना केली.
व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार यांच्या पत्राच्या अनुशंघाने दि. १६/१०/२०२५ ला श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद स्वत: माहिती प्राप्त करण्याच्या अनुशंघाने पतसंस्थेत गेले असता मा.व्यवस्थापक श्रीकोंडावार यांनी अध्यक्षाच्या परवानगी शिवाय आपणास माहिती देता येणार नाही असे सांगितले.
व अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पिपरे यांना दूरध्वनी वर संपर्क साधला तेव्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे यांनी श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांना दि.१७/१०/२०२५ ला सकाळी १०.०० वा. सोसायटीला सुट्टी असली तरी तुम्ही या मी सर्व कर्मचाऱ्यांना २ तासासाठी पतसंस्थेत बोलावितो असे सांगितले व श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद ते मान्य केले. ठरल्याप्रमाणे श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद दि.१७/१०/२०२५ ला सकाळी १०.०० वा. सोसायटीला हजर झाले.
मात्र सकाळी ११.०० वाजता पर्यत अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे व पतसंस्थेचा कोणताही कर्मचारी पतसंस्थेत उपस्थित न झाल्याने श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे यांना दूरध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी दुपारी १२.०० वा पर्यंत पतसंस्थेत उपस्थित राहण्यास सांगितले.श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद त्यादिवशी सकाळी १०.०० वा. ते सायं ४.०० वा पर्यंत सोसायटीला हजर होते.
मात्र अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे व पतसंस्थेचा कोणताही कर्मचारी पतसंस्थेत उपस्थित न झाल्याने श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद सायं.४.२० वा अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे यांचेशी दूरध्वनी वर संपर्क साधला असता पतसंस्थेला सुट्टी असल्याने कोणीही आले नाही असे सांगितले.
तसेच सर्व माहिती दि. २०/१०/२०२५ ला soft कॉपी स्वरुपात आपणास देतो असे सांगितले. मात्र त्यांनी दि. २०/१०/२०२५ ला माहिती दिलेली नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय श्री,पुरुषोत्तम पिपरे सर यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क साधले असता पतसंस्थेला दिवाळी सणानिमित्याने सुट्टी असल्याने पतसंस्था दि.२४/१०/२०२५ पर्यंत बंद आहे
तुम्ही दि. २५/१०/२०२५ ला संस्थेत प्रत्यक्ष या... मी तुम्हाला स्वत: फोन करतो असे म्हणाले. व त्यांनी असेही म्हणाले की, तसेही तुम्ही मला का बर त्रास देता ? माहिती पुरविणे हे सचिवांचे काम आहे त्यांचेशी पत्र व्यवहार करा....!
अध्यक्ष व व्यवस्थापक म्हणून मला व श्रीकोंडावार यांना पत्र देवून काहीच फायदा नाही असे सुचविले,तरीही तुम्ही दि. २५/१०/२०२५ ला संस्थेत प्रत्यक्ष या.. मी तुम्हाला स्वत: फोन करतो असे म्हणाले मात्र त्यांनी कसल्याही प्रकारे संपर्क साधला नसल्याने श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी दि. ३१/१०/ २०२५ व दि. १/११/२०२५ ला दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.
त्यामुळे दि. २/११/२०२५ रोज रविवारला सकाळी ठीक ११.०० वा श्री,सचिन भास्कर कुलसंगे हे प्रत्यक्ष पतसंस्थेमध्ये हजर झाले व परत एकदा अध्यक्ष महोदय श्री, पुरुषोत्तम पिपरे सर यांना दुरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकले नाही.
व त्यांना पाहिजे असलेल्या माहिती विषयी पतसंस्थेत उपस्थित कर्मचारी श्री,सौरभ नरोटे लिपिक व श्री,कुणाल धोडरे लिपिक तसेच हर्षना उंदिरवाडे शिपाई यांना विचारलेले असता व्यवस्थापक महोदय श्रीकोंडावार हे मागील २० दिवसापासून एक महिन्यासाठी वैद्यकिय रजेवर आहेत.
तसेच अध्यक्ष महोदयांच्या परवानगी शिवाय आम्ही काहीच दाखवू शकत नाही असे सांगितले तसेच आपण विचारलेल्या माहिती बाबत आम्हाला कल्पना नाही असे सांगितले. सदर उपस्थित कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक महोदय श्रीकोंडावार वैद्यकीय रजेवर असतांना आर्थिक व्यवहार बंद आहेत काय ? असा प्रश्न विचारले असता व्यवस्थापक महोदय श्रीकोंडावार यांच्या स्वाक्षरीनेच आर्थिक व्यवहार सुरु आहेत असे सांगितले.
व्यवस्थापक महोदय श्रीकोंडावार वैद्यकीय रजेवर असतांना आर्थिक व्यवहार सुरु आहेत तर मग मी विचारलेली माहिती देण्यास अडचण काय ? तसेच व्यवस्थापक महोदय श्रीकोंडावार हे वैद्यकीय रजेवर १ महिना असल्यावर आर्थिक व्यवहार त्यांच्या स्वाक्षरीने करणे योग्य आहे काय ? या वरून अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे तथा संपूर्ण संचालक मंडळ व पतसंस्थेचे कर्मचारी यांनी श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते असा आरोप केला आहे. मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात केवळ भेटवस्तू खरेदीत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे.
तर मागील १० वर्षाच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणे जमा खर्च प्रत्रकाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी केले तर करोडो रुपयाचा गैरव्यवहार व अफरातफर तत्कालीन संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी केले असल्याचे दिसून येईल असे श्री,सचिन भास्कर कुलसंगे सभासद यांनी मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांना लेखी पत्र देवून कळविले त्यानंतर मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांनी २१/११/२०२५ रोजी मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांचे दालनात सुनावणी लावली.
सदर सुनावणीत श्री,सचिन भास्कर कुलसंगे, श्री,अशोक प्रतापराव रायसिडाम व श्री,हेमंत शंकरराव चावरे यांनी प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,चामोर्शी./मुलचेरा. र.न.२७५ या संस्थेत अध्यक्ष, व्यवस्थापक,व संचालक मंडळानी लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचे पुराव्यासह सादर केले होते. ज्यात खालील प्रमाणे स्पष्ट झाले.
क्रमांक - १ सभासदांना मागील वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ भेटवस्तू वितरीत करण्यात आली. परंतु सदर भेट वस्तू खरेदी करण्याबाबत संस्थेने कोणतीही जाहिरात व प्रसिद्धी पत्र काढले नाही.
क्रमांक - २ संस्थेच्या दिनांक ०६/०९/२०२४ च्या मासिक सभेत कोटेशन मंजुरी बाबत ठराव घेण्यात आला परंतु प्रत्यक्ष संस्थेत कोटेशन उपलब्ध नाही. परंतु जावक रजिस्टर मध्ये खाडाखोड करून व पत्र २०२४ चे असतांना २०२५ तारीख दर्शविण्यात आली आहे तसेच तत्कालीन व्यवस्थापक श्री काकडे यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे सिद्ध झाले आहे.
क्रमांक - ३ सभासदांना साहित्य वाटप करण्यात आले परंतु संस्थेत कोणत्याच प्रकारची नोंद साठा पंजी रजिस्टर वर करण्यात आली नाही
क्रमांक - ४ संस्थेने सन २०२३ - २४ वर्षातील ९५० नग भेटवस्तू खरेदी केल्याचे दाखविले आहे. त्यासाठी पुरवठादाराला तब्बल १९,८०,७३१ /- रुपये अदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सभासदांना केवळ ६९७ भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. त्यामुळे ५,२७,४९८ /- रुपये संबंधितांकडून वसुलीस पात्र.
क्रमांक - ५ संस्थेने सन २०२४-२५ वर्षात ९०० भेटवस्तू खरेदी केल्याचे दाखविले आहे. त्यासाठी पुरवठादाराला तब्बल १३,९५,००० /-रुपये अदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सभासदांना केवळ ६१७ भेटवस्तू वितरित करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यामुळे ४,३८,६५० /- रुपये संबंधितांकडून वसुलीस पात्र.
क्रमांक - ६ अशाप्रकारे संस्थेने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी व आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पुरवठादारांसोबत कोणताही पत्रव्यवहार न करता अनुक्रमे १९,८०,७३१ /- रुपये व १३,९५,००० /-रुपये असे एकूण ३३,७५,७३१/- रुपये संगतमताने अदा करण्यात आले. प्रत्यक्ष सन २०२३-२४ मध्ये संस्थेने २५३ वस्तू कमी खरेदी केल्या व सन २०२४-२५ मध्ये संस्थेने २८३ वस्तू कमी खरेदी केल्या. म्हणजेच संस्थेने ५,२७,४९८ /- रुपये व ४,३८,६५० /- रुपये असे एकूण ९,६६,१४८ /- रुपये संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालकांनी संगणमत करून अपहार केल्याचे सिद्ध होते.
क्रमांक - ७ दिनांक १४/०९/२०२५ रोजी संस्थेची ४४ वी वार्षिक आमसभा घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी आम्हाला कोणताही सभासद संस्थेविषयी माहिती विचारू नये, कारण संस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्याची व नियमबाह्य केलेल्या कामाची माहिती मिळेल, या हेतूने आमसभा आटोपल्यावर स्वमर्जीने विषय क्रमांक १२ (३) नुसार सभासदाला पतसंस्थेविषयी माहिती हवी असल्यास १०० /- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून घेणे बंधनकारक केलेले आहे. असा ठराव घेणे सहकार कायद्याच्या अगदीच विपरीत व नियमबाह्य असून सरळ सरळ अध्यक्ष पद अपात्र ठरण्यास व व्यवस्थापकास तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यास पुरेसे आहे.
क्रमांक - ८ दिनांक १७/१०/२०२५ ते दिनांक १५/११/२०२५ पर्यंत संस्थेचे व्यवस्थापक श्री, श्रीकोंडावार हे वैद्यकीय रजेवर असल्याचे आढळतले. परंतु त्यांच्या रजा कालावधीत संस्थेच्या अध्यक्षांनी श्री, श्रीकोंडावार यांच्या बनावट सह्या करून लाखो रुपयाचा व्यवहार केल्याचे आढळले. त्यामुळे पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट होते.
क्रमांक - ९ पतसंस्थेचे प्रत्येक आर्थिक व्यवहार हे सभासद किंवा अन्य कोणत्याही आस्थापनेसोबत करतांना सहकार कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असतांना, श्री,सचिन कुलसंगे व इतर हे माहिती अधिकार अन्वये माहिती गोळा करावयास गेले असता, चेक वितरण रजिस्टर वरून रँडमली दोन मॅडम सोबत बोलले,श्रीमती जमनी मठ्ठामी मॅडम यांनी २००० /- रुपये उचल केलेली नसतांनाही त्यांचे नावे २००० /- रुपयाचे अनामत माहे ३०/१०/२०२५ रोजी दाखविण्यात आले होते.
तसेच श्रीमती गीता गंगाराम वैरागडे मॅडम यांनी ११०१० /- रुपयाचे अनामत घेतले नसतांना यांचे नावे ११०१० /- रुपये अनामत दाखविले व वितरण रजिस्टर वर व्हावचर वर स्वाक्षरी केले.
प्रत्यक्षात मात्र संस्थेतील कंत्राटी लिपिक श्री, कृणाल धोडरे यांनी स्वतःच्या वैयक्तिक खात्याचा वापर करून केवळ ९०१० /- रुपये स्वतःच्या खाजगी मोबाईल मधून अदा केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मात्र संस्थेचे संचालक श्री,लोणारे सर यांनी सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२/११/२०२५ ला याबाबत स्वतः सत्यता पडताळण्यास पतसंस्थेत गेले असता श्री,कृणाल धोंडरे यांनी माझ्या कडून चूक झाली व अशी चूक मी भविष्यात करणार नाही असे सांगितले.
याबाबत खुद्द संचालक श्री लोणारे सर यांनी संस्थेच्या अधिकृत व्हाट्सअप या प्रसार माध्यमात याची ऑडिओ क्लिप टाकून सत्यता आहे हे सिद्ध केले. यावरून हे स्पष्ट होते की संस्थेचे कर्मचारी हे संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्याशी संगणमत करून असे विविध आर्थिक घोटाळे करीत असल्याचे निदर्शनास येते.
क्रमांक - १० श्री,सचिन कुलसंगे व इतर दि.२०/११/२०२५ ला पतसंस्थेत गेले असता संस्थेचे कंत्राटी लिपिक श्री कृणाल धोडरे यांनी परस्पर आपल्या खाजगी बँक खात्याचा वापर करून सभासदांसोबत आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कॅश बुकची मागणी करून पाहणी केली असता संस्थेने माहे ऑगस्ट २०२५ पासून कॅशबुक मध्ये कोणतीही नोंद केली नसल्याचा खळबळजनक प्रकार दिसून आला.यावरून हे स्पष्ट होते की, संस्थेचे कर्मचारी,संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांचे सोबत संगणमत करून आर्थिक घोटाळा घडवून आणायचा व नंतर एकदाच अनेक महिन्याचा कॅशबुक लिहून पूर्ण करायचा.
यावरून असेही लक्षात येते की, काही महिन्यानी एकत्रित बसून रूपयाची जुळवा जुळव करून कॅशबुक लिहायचा प्रकार सुरु आहे. यामुळेच संस्थेतील मोठ्या रक्कमेचा अजूनही ताळमेळ जुळत नाही व भ्रष्टाचारासाठी सारे रान मोकळे असल्याचे दिसून येते.यावरून हे स्पष्टच होते की, संस्थेत खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व आर्थिक घोटाळा सुरु आहे.
क्रमांक - ११ पतसंस्थेत नेहमी पाहणी केली असता हाती रोख रक्कम १,००,००० ते ५,००,०००/- रु.पर्यंत असते.सदर रक्कमेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे पतसंस्थेत लाखो रुपयाचा आर्थिक घोटाळा झाल्याचे निष्पन्न होत आहे.त्यामुळे अध्यक्ष व व्यवस्थापक हे संस्थेत झालेला लाखो रुपयांचा घोटाळा गैरमार्गाचा वापर करून त्यातील पुरावे नष्ट करण्याचा व फेरफार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्री,सचिन भास्कर कुलसंगे व इतर ४५ दिसून येत आहे.
करीता आपण दि.२४/१२/२०२५ रोज बुधवार पर्यंत प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,चामोर्शी./मुलचेरा.र.न.२७५,संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करून तत्काळ संस्थेतील लाखोंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर सहकार कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाही करून संस्थेतील सर्व सामान्य सभासदांना न्याय मिळवून द्यावा
अन्यथा दिनांक.२६/१२/२०२५ रोजी मा.उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरोली कार्यालय पुढे बेमुदत उपोषणास बसु. याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे लेखी पत्राद्वारे वरिष्ठ कार्यालयाला श्री,सचिन भास्कर कुलसंगे व इत्तर ४५ शिक्षकांनी कळविले आहे.

