पोलिस आणि नक्षलवादी मध्ये झालेल्या भीषण चकमकीत 3 नक्षलवादी ठार. जवान दीपक मडावींना वीरमरण तर 1 जवान जखमी प्रकृती स्थिर.

पोलिस आणि नक्षलवादी मध्ये झालेल्या भीषण चकमकीत 3 नक्षलवादी ठार.


जवान दीपक मडावींना वीरमरण तर 1 जवान जखमी प्रकृती स्थिर.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : गडचिरोली - छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस आणि नक्षलवादी झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या C- 60 कमांडोंनी 5 फेब्रुवारी रोजी एक नक्षलवादी ठार केले होते. 

शहीद पोलीस जवान दिपक चिन्ना मडावी


एक जवान जखमी झाला होता.घटनास्थळी आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. या कारवाईत जखमी झालेले जवान दीपक चिन्ना मडावी वय,38 वर्ष रा.दामरंचा ता.अहेरी,ह.मु.अहेरी) यांना वीरमरण आले आहे.


3 फेब्रुवारी पासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत 6 रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली.यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष नक्षलद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत एकूण 3 माओवादी ठार झाले असून त्यांच्याकडून एक AK - 47 आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.


​जवान दीपक मडावींना वीरमरण : -

‎​या चकमकीत जखमी झालेले C - 60 जवान दीपक चिन्ना मडावी वय,38 वर्ष रा.अहेरी यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.


‎​आणखी एक जवान जखमी प्रकृती स्थिर : - 

‎​याच मोहिमेदरम्यान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे जवान देखील गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने बाहेर काढून भामरागड येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


अबुझमाडचा परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाचा आहे. या भागात अजूनही माओवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.‎ - नीलोत्पल,पोलिस अधीक्षक,गडचिरोली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !