सावली तालुक्यातील निमगाव येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा समाजाच्या वतीने दोन दिवसीय कार्यक्रम उत्साहात साजरा.
एस.के.24 तास
सावली : दिनांक २०/१२/२०२५ ते २१/१२/२०२५ श्री.संताजी सांस्कृतिक मंडळ निमगांव रजी नं.००००७२७/२०२५ यांच्या वतीने श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा समाजाच्या वतीने दोन दिवसीय कार्यक्रम साजरा करण्यात आला दि.२०/१२/२०२५ रोज शनिवारला पहाटे सर्व तेली समाजाच्या वतीने परिसर सफाई करण्यात आली.
घटस्थापना सकाळी ८ वाजता श्री.फाले महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण मंडळाचे अध्यक्ष श्री माननीय पुरुषोत्तम प्र. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. व दुपारी महिला मेळावा घेण्यात आला त्यानंतर रात्रौ श्री दखने महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला व दुसऱ्या दिवशी २१/१२/२०२५ रोज रविवारला सकाळी ९ वाजता निमगांवमधून रामधून / शोभायात्रा पालखी मिरवणूक ढोल ताशा व लेझीमाच्या गजरात काढण्यात आली.
त्यामध्ये संतांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व समाज बांधव, तथा परिसरातील समाज बांधव सहभागी झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. विठ्ठलरावजी निखुले सर सेवानिवृत्त प्राचार्य सचिव तेली समाज संघटना नागपूर, त्यांनी सर्व समाज बांधवांना संघटित होण्यास प्रेरित केले. या कार्यक्रमांमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ.प्रतिक्षा विवेक ठाकरे यांनी आभार मानले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रकाशजी मा करकाडे यांनी केले संध्याकाळी ५ वाजता गोपाळकाला व सहभोजन घेण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता प्रफुल मो.भरडकर,रुपेश भरडकर,मुखरु समर्थ,दुमाजी आ.ठाकरे, महेश करकाडे यांनी केली.




