मोहाली चंदीगढ येथील आरोपी हिमांशू भारव्दाज याचा रोशन कुडे व अन्य सहकाऱ्यांसोबतचा विमानतळावरील व्हीडीओ समाेर.
एस.के.24 तास
नागभीड : कंबोडिया मूत्रपिंड विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी रामकृष्णन सुंचू याला गुरूवारी ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.सुंचू याने मूत्रपिंड विक्री केलेल्या काहींची नावे पोलीसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोहाली चंदीगढ येथील आरोपी हिमांशू भारव्दाज याचा रोशन कुडे व अन्य सहकाऱ्यांसोबतचा विमानतळावरील व्हीडीओ समाेर आला आहे. हिमांशू याने खासगी कंपनीतील नोकरी गमावल्यानंतर स्वत:चे मूत्रपिंड विक्री करून मानव अवयव तस्करी रॅकेटमध्ये सक्रीय झाला. दरम्यान विशेष पोलिसांचे एक पथक कोलकता येथून पसार अभियंता पॉल या आरोपीचा शोध घेत आहेत.
काही व्यक्तींची नावे सांगितल्याची माहिती आहे. ज्या व्यक्तींची नावे सांगितली या सर्वांनी कंबोडिया येथे मुत्रपिंड विक्री केले आहे. तसेच हिमांशू भारव्दाज याचा कोलकोता विमानतळावरील एक व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओत हिमांशू हा नागभीड च्या रोशन कुडे तसेच इतर काही युवकांना कंबोडिया येथे घेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हीडीओत दिसणाऱ्या सर्व युवकांची पोलीस माहिती गोळा करित आहेत. हिमांशू याने स्वत: मूत्रपिंड विक्री केले आहे. त्याचेही मूत्रपिंड हे चीन येथील रूग्णाला शस्त्रक्रियेव्दारे लावण्यात आल्याची माहिती आहे.

